Chandrapur : तो फोटो अखेरचा ठरला! सेल्फी काढून ५ मित्र पोहायला उतरले, पण परतलेच नाहीत; नेमकं काय घडलं?

Chandrapur Wardha Tragedy News : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील पाच तरुण वर्धा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. बचाव पथक युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.
CHANDRAPUR WARDHA RIVER TRAGEDY: THREE YOUTHS DEAD, TWO MISSING AFTER DROWNING INCIDENT
CHANDRAPUR WARDHA RIVER TRAGEDY: THREE YOUTHS DEAD, TWO MISSING AFTER DROWNING INCIDENTSaam Tv
Published On
Summary
  • घुग्गुस येथील पाच तरुण पोहण्यासाठी वर्धा नदीकाठी गेले

  • नदीत बुडाल्याने तिघांचा मृत्यू, दोन तरुण अद्याप बेपत्ता

  • नदी परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

  • या दुर्दैवी घटनेमुळे घुग्गुस परिसरात शोककळा

चंद्रपूर, संजय तुमराम

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. वर्धा नदीत पोहायला गेलेले पाच तरुण बुडाले असून तिघांचा मृतदेह सापडले, तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पुन्हा एकदा नदी, धरणाजवळील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घुग्गुस येथील इंदिरा नगर परिसरात राहणारे पाच तरुण पोहण्यासाठी चांदूर गावाजवळील वर्धा नदीकाठी गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान नदीकाठी तरुणांचे कपडे आणि मोबाईल फोन आढळून आल्याने ते नदीत बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

CHANDRAPUR WARDHA RIVER TRAGEDY: THREE YOUTHS DEAD, TWO MISSING AFTER DROWNING INCIDENT
Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान बचाव पथकाला पाचपैकी तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र उर्वरित दोन तरुणांचा अद्याप शोध लागलेला नसून शोधकार्य सुरू आहे.

CHANDRAPUR WARDHA RIVER TRAGEDY: THREE YOUTHS DEAD, TWO MISSING AFTER DROWNING INCIDENT
Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

बुडालेल्या तरुणांची नावे सम्यक देवराव सोनटक्के (१८), संनी अशोक आस्मपेल्ली (१९), रोहित बाबाराव बोबडे (१९), शिव भास्कर केलझरकर (१९) आणि तन्मय नवनाथ पथाडे (१८) अशी आहेत. हे सर्व युवक घुग्गुस शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्व युवकांचे वय १५ ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उर्वरित दोन युवकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदी परिसरात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com