MP Balu Dhanorkar Health Update : प्रकृतीची माहिती कळताच खासदार बाळू धानोरकरांची मुलेही दिल्लीस रवाना

balu dhanorkar : आज (साेमवार) त्यांची मुले दिल्लीला रवाना झालीत.
MP Balu Dhanorkar, Delhi
MP Balu Dhanorkar, DelhiSaam Tv
Published On: 

MP Balu Dhanorkar News : दिल्ली येथी उपचारार्थ दाखल असलेले खासदार बाळू धानोरकर (mp balu dhanorkar health update) यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान धानाेरकर हे उपचाराला प्रतिसाद देताहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून कार्यकर्त्यांसह जनतेने काळजी करु नये असे आवाहन त्यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे. (Maharashtra News)

MP Balu Dhanorkar, Delhi
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

काॅंग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची शनिवारी प्रकृती बिघडली. त्यांना शनिवारी (ता. २७) नागपुरातील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला नेण्यात आले.

MP Balu Dhanorkar, Delhi
Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात खासदार धानोरकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देताहेत परंतु त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा या आहेत. आज (साेमवार) त्यांची मुले दिल्लीला रवाना झालीत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com