

माजी नगरसेवक अजय सरकार यांच्यावर हद्दपारीची कारवाई
तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
अजय सरकार यांच्याविरोधात एकूण 17 गुन्हे दाखल
संजय तुकराम, साम प्रतिनिधी
चंद्रपुरातील भाजपचे माजी नगरसेवकावर जिल्हा प्रशासनाने हद्दपारीची कारवाई केली आहे. अजय सरकार असं भाजपच्या माजी नगरसेवकांचे नाव आहे. विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या पार्श्वभूमीवर अजय सरकार यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
सरकार यांच्याविरोधात यापूर्वीही हद्दपारीची कारवाई झाली होती. एकूण 17 गुन्ह्यांपैकी 8 प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून 9 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. प्रशासनाने दोन वर्षांच्या प्रस्तावित हद्दपारीऐवजी त्यांची बाजू ऐकून तीन महिन्यांच्या कालावधीची कारवाई केली आहे. अजय सरकार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
जोरगेवार यांनीच मनपा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर सरकार यांनी जोरगेवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आताही त्यांनी जोरगेवार यांना इशारा दिला. सरकार हे मुनगंटीवार समर्थक मानले जातात.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईचा भाजप नेत्यानं विरोध केलाय. त्याबाबत त्यांनी एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केलाय. दोनशे युनिटचा मुद्दा वारंवार उपस्थित करत असल्यानं माझ्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं अजय सरकार म्हणालेत. जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमागे मोठं षडयंत्र आहे. स्थानिक आमदाराने जिल्हा प्रशासनावर राजकीय दबाव आणून माझ्यावर कारवाई करण्यास सांगितलं. परंतु २०० युनिटचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे ही कारवाई झाली.
परंतु अजय सरकारवर हद्दपारची कारवाई करण्यात आली म्हणजे विषय संपणार नाही. असे अनेक सरकार जन्मायला येतील. २०१९ मध्ये निवडणूक प्रचारात खोटा प्रचार करून मतं मिळवली. २०० युनिट मोफत वीज देणार असल्याचं आश्वसन देऊन तुम्ही मतं मिळवली. परंतु या खोटेपणाचा हिशोब जनता घेणार आहे. तुमच्या मुलाची चिंता तुम्ही आता करा. त्याच्यावर तडीपारची कारवाई होणार होईल, असा इशारा माजी नगरसेवक अजय सरकारनं दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.