Chandrapur Politics: मोठी घडामोड! भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेची ऑफर, काँग्रेसचं टेन्शन वाढलं

Chandrapur Municipal Corporation: चंद्रपूर महानगरपालिकेत एक मोठा राजकीय वळण आलंय. कारण भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तावाटपाची ऑफर दिलीय. यामुळे सर्वाधिक जागा असूनही काँग्रेस अडचणीत आली आहे.
Chandrapur Municipal Corporation:
Political churn intensifies in Chandrapur Municipal Corporation as BJP reaches out to Thackeray-led Shiv Sena for power-sharing talks.saam tv
Published On
Summary
  • चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा तिढा कायम

  • भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेची मोठी ऑफर

  • महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व उपमहापौर पदांचा फॉर्म्युला

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेचं घोड अडलंय. त्याचदरम्यान भाजपनं मोठा डाव खेळत भाजपनं थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मोठी ऑफर दिली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. सर्वाधिक जागा असूनही काँग्रेस सत्तास्थापनेत पिछाडीवर आहे.

Chandrapur Municipal Corporation:
Zill Parishad Election: आमदार आणि उमेदवारांच्या अल्पवयीनं मुलांनीच केलं मतदान, नेमका कुठे घडला प्रकार

भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदासाठी सव्वा–सव्वा वर्षांचा प्रस्ताव देण्यात आलाय. यासोबतच पाच वर्षांच्या कालावधीत दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाचीही ऑफर भाजपने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण यातही भाजपनं एक अट ठेवलीय, ती अट अशी आहे, महापालिकेतील महापौरपद सुरुवातीला आधी भाजपकडे असावं. जर हा फॉर्म्युला शिवसेना (उबाठा) मान्य करणार नसेल, तर भाजप सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकांवर बसण्यास तयार आहे.

Chandrapur Municipal Corporation:
भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

दरम्यान येथे काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पण पक्षातील अतंर्गत वादामुळे सत्ता स्थापनेचं घोडं अडलंय. काँग्रेसमधील नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचा फायदा भाजपने घेतलाय. काँग्रेसनेही ठाकरेंच्या शिवसेनेला अडीच वर्षांच्या महापौरपदाची ऑफर दिलीय. मात्र भाजपने दिलेली ऑफरवर ठाकरे गट विचार करेल असं असा अंदाज लावला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com