Zill Parishad Election: आमदार आणि उमेदवारांच्या अल्पवयीनं मुलांनीच केलं मतदान, नेमका कुठे घडला प्रकार

Zilla Parishad Election: कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे निवडणुकांमध्ये वाद निर्माण होतात. आज झालेल्या झेडपी निवणुकीच्या निमित्तानं वेगळाच वाद निर्माण झालाय. चक्क आमदार आणि उमेदवारांच्या अल्पवयीनं मुलांनी मतदान केल्यानं मोठी खळबळ माजलीय. नेमका हा प्रकार कुठे आणि कोणत्या नेत्यांबाबत झालाय? पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
Zilla Parishad Election
Alleged underage voter at a polling booth during Zilla Parishad elections, triggering controversy.
Published On
Summary
  • झेडपी निवडणुकीत अल्पवयीन मतदानाचा गंभीर आरोप

  • छत्रपती संभाजीनगर व अकलूजमधील मतदान केंद्रांवर प्रकार

  • आमदार व उमेदवारांच्या मुलांवर मतदान केल्याचा आरोप

वयाचं 18 वर्ष पूर्ण झालं का ठासून मतदान करायचं. त्यो आपला अधिकारचं हाय पणं त्या संभाजीनगरमध्ये अन् अकलूजमधी नेत्यांनी डोकं ठेवलंय घरी. असं का म्हणतूय त्यासाठी जरा ध्यान दिवून बघा. ही हाय विलास भुमरे... खासदास संदीपान भुमरेंचं चिरंजीव अन् आमदार... मतदानाच्या दिवशी गडी पांढरी कापडं घालून थाटात सकाळीच पाचोड गावच्या मतदान केंद्रावर हजर. गडी एकटं येत्याल ती विलास भुमरे कसलं. ढीगभर कार्यकर्त्यांसग त्यांनी लेकालाबी आणलं.

अधिकाऱ्यांनी बोटाला लावली शाई. मग लेकानं धरला हट्ट अन् म्हणला माझ्या बी बोटाला लावा शाई घट्ट. शाई लावली म्हटल्यावर पुढं लेक अन् बाप गेलं मतदान करायला. छापडीच्या पलिकडं बाप अन् लेकानं दाबलं EVM चं बटण... आता ऐका विलास भुमरे काय म्हणत्यात. आता तुम्ही करा सारवासारव... पण जनता लय हुशार हाय... सगळं दिसतंय अन् कळतंय बी.... आता गाडी थेट संभाजीनगरमधून अकलूजकडं वळवूया...

तिकडं अर्जूनसिंह मोहिते पाटलांनी लयच डोक लढवलंय. थेट लेकालाच सांगितलं मतदान करायला. बघा की .. सकाळी वाघ पोहोचलं मतदान केंद्रावर... फोंडशिरस गटातून उमेदवार असलेलं अर्जूनसिंह मोहिते पाटील.. चिरंजीवाला घेवून गेलं EVM जवळ अन् दाबायला लावलं बटन... हाय का नाय कुटाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com