Chandrapur : धक्कादायक! कॅन्सर रुग्णालयाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सकडून खंडणीची मागणी

Chandrapur Hospital Cyber Attack News : चंद्रपूरमधील कॅन्सर रुग्णालयाच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा एन्क्रिप्ट करून खंडणीची मागणी केली आहे.
CHANDRAPUR CANCER HOSPITAL HIT BY CYBER ATTACK, HACKERS DEMAND BITCOIN RANSOM AFTER DATA BREACH
CHANDRAPUR CANCER HOSPITAL HIT BY CYBER ATTACK, HACKERS DEMAND BITCOIN RANSOM AFTER DATA BREACHSaam Tv
Published On
Summary
  • चंद्रपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या मुख्य सर्व्हरवर सायबर अटॅक

  • हॅकर्सनी रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा एन्क्रिप्ट करून खंडणीची मागणी केली

  • सायबर तज्ज्ञांकडून तपास सुरू

  • या घटनेमुळे राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील कॅन्सर केअर फाउंडेशन (Cancer Hospital ) च्या मेन सर्व्हरवर सायबर अटॅक करण्यात आला आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा लीक करून खंडणी मागितल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला असून रुग्णांच्या माहितीच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी सकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या आयटी विभागाला मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळले. सुरुवातीला किरकोळ असल्याचे वाटत होते. मात्र, तपासणी केल्यानंतर सर्व्हरवर रॅन्समवेअरचा धमकीचा मेसेज दिसून आला. त्यानंतर अज्ञात सायबर गुन्हेगारांनी रुग्णालयाच्या डिजिटल यंत्रणेत घुसखोरी करून संपूर्ण डेटा एन्क्रिप्ट केल्याचे स्पष्ट झाले.

CHANDRAPUR CANCER HOSPITAL HIT BY CYBER ATTACK, HACKERS DEMAND BITCOIN RANSOM AFTER DATA BREACH
Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

या सायबर हल्ल्यामुळे हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम (HIMS) पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी रुग्णांची माहिती, उपचारांशी संबंधित नोंदी, तसेच प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती तात्पुरती लॉक करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॅकर्सनी सर्व्हरवर केलेल्या मेसेजमध्ये खंडणीची रक्कम बिटकॉईनच्या स्वरूपात भरण्याची मागणी केली आहे.

CHANDRAPUR CANCER HOSPITAL HIT BY CYBER ATTACK, HACKERS DEMAND BITCOIN RANSOM AFTER DATA BREACH
Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

मागितलेली रक्कम भरल्यानंतरच डेटा अनलॉक करण्यासाठी आवश्यक ‘डिक्रिप्शन की’ दिली जाईल, अन्यथा संपूर्ण डेटा कायमस्वरूपी डिलीट केला जाऊ शकतो, अशी धमकीही देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे चंद्रपूरसह राज्यातील इतर रुग्णालयांच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com