Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Maharashtra Washim Bribe Case News : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता मिटकरी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
WASHIM ACB TRAPS DHORKHEDA SARPANCH ACCEPTING ₹25,000 BRIBE DURING IDEAL VILLAGE INSPECTION
WASHIM ACB TRAPS DHORKHEDA SARPANCH ACCEPTING ₹25,000 BRIBE DURING IDEAL VILLAGE INSPECTIONSaam Tv
Published On
Summary
  • वाशिम एसीबीने ढोरखेडा गावात धक्कादायक प्रकार

  • ग्रामपंचायतीच्या सरपंचांना २५ हजारांची लाच घेताना पकडले

  • बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप

  • पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून एसीबी तपास करत आहे

मनोज जैस्वाल, वाशिम

Washim Sarpanch Sunita Mitkari Caught Red Handed Taking Bribe वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मधून मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतीची आदर्श गाव म्हणून तपासणी सुरू होती, त्याच गावातील सरपंच लाच प्रकरणात अडकल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढोरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत सुमारे ४.५ लाख रुपयांच्या नाली बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडे १० टक्के रकमेची मागणी करण्यात आली होती. ही मागणी सरपंचांच्या वतीने त्यांच्या पतीने केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. कंत्राटदाराकडून बिल मंजुरीच्या मोबदल्यात सुरुवातीला मोठी रक्कम मागितली गेली होती. मात्र चर्चेनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

WASHIM ACB TRAPS DHORKHEDA SARPANCH ACCEPTING ₹25,000 BRIBE DURING IDEAL VILLAGE INSPECTION
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

या प्रकारामुळे तक्रारदाराने वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ३ जून रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार ४ जून रोजी एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत सरपंच सुनीता मिटकरी यांना २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

WASHIM ACB TRAPS DHORKHEDA SARPANCH ACCEPTING ₹25,000 BRIBE DURING IDEAL VILLAGE INSPECTION
Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एसीबीकडून पडताळणी सुरू असतानाच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक विशेष पथक ढोरखेडा गावात ग्रामपंचायतीच्या कामकाजाची तपासणी करत होते. तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे ढोरखेडा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला होता आणि आदर्श ग्रामपंचायत म्हणून तिची निवड करण्यात आली होती. एकीकडे आदर्श ग्रामपंचायतीचा सन्मान मिळवण्यासाठी गावाची तपासणी सुरू असताना दुसरीकडे सरपंच लाच प्रकरणात अटकेत सापडल्याने प्रशासनासह ग्रामस्थांमध्येही खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com