महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! माजी मंत्री बच्चू कडूंवर भाजप आमदारच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा

Bachchu Kadu latest news : प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप करत गुन्हा दाखल. अमरावती पोलिसांचा तपास सुरू असून राज्याच्या राजकारणात खळबळ.
Bachchu Kadu latest news
Bachchu Kadu latest newsSaam TV MArathi
Published On

अमर गटारे, साम टीव्ही प्रतिनिधी

Bachchu Kadu FIR details in Amravati case : प्रहारचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराच्या भावाचा अपघाताचा बनाव करून खून करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आता गुन्हा नोंदवण्यात आला असून, बच्चू कडू यांनी कट रचून भाजप आमदाराच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अमरावती पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. (BJP MLA brother murder attempt Maharashtra)

अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे माजी मंत्री बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर कट रचून ठार मारण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Bachchu Kadu latest news
बारामतीची निवडणूक बिनविरोध नाही, राहुरीतही काँग्रेस उमेदवार देणार, शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

भाजप आमदाराचे भाऊ अभिजित दिवाकरराव तायडे (वय ४०) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. अभिजित तायडे हे अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत. बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अमरावतीसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तायडे यांनी तक्रार करताना पोलिसांना एक ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर काही पुरावे दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बच्चू कडू यांना अटक होणार का, असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे.

Bachchu Kadu latest news
एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून आणून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कटात शुभम ऊर्फ गोलू माहोरे याचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संभाषणाचे मोबाईल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आले असून, या रेकॉर्डिंगचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे जमा आहे. चांदूर बाजार पोलिसांनी 'बीएनएस' (BNS) कलम ५५, ५८ आणि ६१ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करत आहेत.

Bachchu Kadu latest news
पहाटे काळाने घाला घातला! त्याची कार थेट कालव्यात गेली, पत्नी अन् सासू-सासऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com