छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तब्बल 46 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Case Registered For Sambhaji Maharaj Statue Installation In Bori: परभणी जिल्ह्यातील बोरी गावात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी 46 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police presence in Bori village, Parbhani, after tension erupted over the installation of a statue of Chhatrapati Sambhaji Maharaj
Police presence in Bori village, Parbhani, after tension erupted over the installation of a statue of Chhatrapati Sambhaji MaharajSaam Tv
Published On

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणी जिल्ह्यातील बोरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा गुरुवारी (दि.19) शिव जयंतीच्या दिवशी बसविण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुतळा बसविण्यात आल्याचे युवकांनी सांगितले. मात्र हा पुतळा विनापरवाना बसवला असे पोलिसांचे म्हणणे असून त्यामुळे 46 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 3 जणांना अटक ही केली आहे. यामुळे गावकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बोरी बंदची हाक पुकारली असून गावात तणाव निर्माण झाला आहे.

Police presence in Bori village, Parbhani, after tension erupted over the installation of a statue of Chhatrapati Sambhaji Maharaj
दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

बोरी गावतील युवकांनी सांगितले की, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी आधीच जागा निश्चित करण्यात आली असून ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहे. त्यामुळेच पुतळा बसविण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. प्रशासनाकडून कागदपात्रांची पडताळणी सुरू केली जाईल आणि सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतरच पुतळा बसविण्याबाबत निर्णय दिला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते, मात्र शिवजयंतीच्या दिवशीच गावकऱ्यांनी पुतळा बसवला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी येत तब्बल 46 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

Police presence in Bori village, Parbhani, after tension erupted over the installation of a statue of Chhatrapati Sambhaji Maharaj
डोळ्यांत अश्रू, हातात पेन; वडिलांचं पार्थिव घरात ठेवून लेकीने दिला दहावीचा पेपर

या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बोरी बंदचे आवाहन करण्यात आहे होते. बोरीकरांनी आज सर्व बाजारपेठ बंद ठेवून या प्रकरणातील दाखल खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बोरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत हरीपाठ गायला आहे. महत्वाचे म्हणजे बोरीत संभाजी महाराज यांचा पुतळा बसला यानंतर दारूच्या नशेत संभाजी महाराज यांचा पुतळा ओढून फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिट जमादार दिलावर यांच्यावर कडक कारवाईची मागणी ही यावेळी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com