दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

Farmer Suicide Before Daughter Wedding In Washim: वाशिम जिल्ह्यातील नवघरे गावात मुलीच्या लग्नाच्या अवघ्या 20 दिवसांपूर्वी कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.
Grief-stricken family members mourn after a farmer’s tragic death ahead of his daughter’s wedding in Washim district.
Grief-stricken family members mourn after a farmer’s tragic death ahead of his daughter’s wedding in Washim district.Saam Tv
Published On

मनोज जैसवाल, साम टीव्ही

वाशिम जिल्ह्यातील पांगरी तालुक्यात असलेल्या नवघरे या गावात मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच मुलीच्या वडिलांचा मृत्यूदेह आणण्याची वेळ कालापाड परिवारावर आली. मुलीचे लग्न अवघ्या 20 दिवसांवर आले होते. आज राजू कालापाड यांच्या मुलीच्या लग्न बस्त्याची खरेदी होणार होती. मात्र पैश्याची जुळवा जुळव न झाल्याने आर्थिक नैराश्यातून अल्पभूधारक शेतकरी राजू कालापाड यांनी गळफास लावून आत्महत्या केली. घरात आत्महत्येचं कळताच एकच आक्रोश सुरू झाला. आनंदाचा क्षण अचानक दु:खात बदलला.

Grief-stricken family members mourn after a farmer’s tragic death ahead of his daughter’s wedding in Washim district.
Shocking : अनैतिक संबंधांत सासूचा अडथळा, सूनेनं विषप्रयोग केला पण फसला; नवऱ्याचाच गेला जीव

राजू कालापाड यांच्याकडे अवघी एक एकर शेती आहे. मात्र गेल्या काही वर्षात अपेक्षित उत्पन्न शेतात न झाल्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढला होता. त्यामुळे राजू पत्नीसह पुण्यात मोलमजुरीसाठी गेले होते. पण मुलीच्या लग्नासाठी काही दिवसांपासून ते गावी आले होते. आज सकाळी त्यांचे शरीर निंबाच्या झाडाला गळफास लावल्याचे आढळून आले.

Grief-stricken family members mourn after a farmer’s tragic death ahead of his daughter’s wedding in Washim district.
डोळ्यांत अश्रू, हातात पेन; वडिलांचं पार्थिव घरात ठेवून लेकीने दिला दहावीचा पेपर

राजू यांच्या पश्चात एक मुलगी आणि दोन लहान मुलं आहेत. अवघ्या 20 दिवसांवर मुलीचे लग्न आले होते. त्या पूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्यानं गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com