Shocking: आईने पोटच्या ३ मुलांना गळफास दिला, नंतर पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...

Karnataka Crime News: कर्नाटकमध्ये एका महिलेने पोटच्या ३ मुलांचा जीव घेतला. मुलांना गळफास दिला. त्यानंतर या महिलेने पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कर्नाटकात खळबळ उडाली.
Shocking: आईने पोटच्या ३ मुलांना गळफास दिला, नंतर पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...
Karnataka Crime NewsSaam Tv
Published On

Summary -

  • बागलकोट जिल्ह्यात एका घरात तीन मुलांचे मृतदेह आढळून आले

  • मुलांची आई बेशुद्धावस्थेत आढळून आली

  • आईनेच आपल्या तीन मुलांची हत्या केली नंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला

  • घटनेमागे कौटुंबिक वादाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

पोटच्या ३ मुलांची हत्या करून आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात ही घटना घडली. महिलेने आधी ३ मुलांना गळफास दिला. त्यानंतर तिने पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे. महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बदामी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरामध्ये तीन मुलांचा मृतदेह आढळून आला. तिघांना गळफास देण्यात आला होता. तर या मुलाची आई बेशुद्धावस्थेत आढळून आली. पोलिसांनी तात्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिने पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटा घडली.

Shocking: आईने पोटच्या ३ मुलांना गळफास दिला, नंतर पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...
Dombivli Crime: माझ्या मुलीकडे का बघतो? जाब विचारल्याने पोरीच्या वडिलांना मारलं, मद्यधुंद तरुणांचा हैदोस; VIDEO व्हायरल

पोलिसांच्या सांगितले की, महिलेची प्रकृती गंभीर असल्याने सध्या जबाब नोंदवण्यात आलेला नाही. तिची प्रकृती सुधारल्यानंतरच चौकशी सुरू केली जाईल. तपासात असे दिसून आले आहे की महिलेचा पती हनुमंत घटनेच्या वेळी घरी नव्हता. तो त्याच्या आईला मंदिरात सोडून शेतात गेला होता. दुपारी २ वाजता तो परत आला तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला आणि आतील दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला.

Shocking: आईने पोटच्या ३ मुलांना गळफास दिला, नंतर पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...
Beed Crime: पैशांवरून वाद, तरुणाकडून जिवलग मित्राची हत्या, डोक्यात दगड घालत जागीच संपवलं

घटनेच्या आदल्या रात्री घरामध्ये किरकोळ भांडण झाले होते. सासू आणि सुनेमध्येही वाद झाल होता. या महिलेचे लग्न ८ वर्षांपासून झाले होते. तिच्या आई-वडिलांचे आणि सासरच्यांचे घर एकाच परिसरात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. कौटुंबिक वादातूनच महिलेने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महिलेच्या जबाबानंतरच नेमकं कारण समोर येईल.

Shocking: आईने पोटच्या ३ मुलांना गळफास दिला, नंतर पेट्रोल पित आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...
Beed Crime: परळीतील लॉजवर पोलिसांचा छापा, २ महिला अन् पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com