Beed Crime: पैशांवरून वाद, तरुणाकडून जिवलग मित्राची हत्या, डोक्यात दगड घालत जागीच संपवलं

Beed Police: बीडमध्ये एका तरुणाने आपल्या मित्राचीच निर्घृण हत्या केली. उसने घेतलेले पैसे देण्यावरून वाद झाला. या वादात तरुणाने मित्राच्या डोक्यात दगड घालत त्याला संपवलं. आरोपीला पोलिसांनी २४ तासांत अटक केली.
Beed Crime: पैशांवरून वाद, तरुणाकडून जिवलग मित्राची हत्या, डोक्यात दगड घालत जागीच संपवलं
Beed CrimeSaam TV
Published On

Summary -

  • उसन्या पैशांच्या वादातून जिवलग मित्राची निर्घृण हत्या

  • डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या करण्यात आली

  • पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली

  • पाटोदा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला

योगेश काशिद, बीड

उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाने मित्राची हत्या केली. डोक्यात दगड घालून तरुणाने मित्राला जागीच संपवले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. बीड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलोसिांनी आरोपी अतिक गुलाब तांबोळीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी गावच्या शिवारातही घटना घडली होती. याठिकाणच्या बीड ते शिरूर रोडवर २ फेब्रुवारी रोजी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा, ता. शिरूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तो व्यवसायाने पेंटर होता. या तरुणाची डोक्यात दगड मारून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Beed Crime: पैशांवरून वाद, तरुणाकडून जिवलग मित्राची हत्या, डोक्यात दगड घालत जागीच संपवलं
Beed Crime: परळीतील लॉजवर पोलिसांचा छापा, २ महिला अन् पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

तपासाचे चक्र फिरवत अज्ञात आरोपीविरोधात कोणतेही पुरावे नसताना हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले. या पथकाने काही तासांच प्रकरणाचा उलगडा केला. तपासादरम्यान संशयाची सुई अतिक गुलाब तांबोळी (रा. ईस्लामपुरा पेठ, बीड) याच्याकडे वळली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला बीडच्या शासकीय रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतले.

Beed Crime: पैशांवरून वाद, तरुणाकडून जिवलग मित्राची हत्या, डोक्यात दगड घालत जागीच संपवलं
Dombivli Crime: माझ्या मुलीकडे का बघतो? जाब विचारल्याने पोरीच्या वडिलांना मारलं, मद्यधुंद तरुणांचा हैदोस; VIDEO व्हायरल

सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी अतिकने मृत चाँद तांबोळी याच्याकडून काही पैसे हातउसणे घेतले होते. चाँदने वारंवार पैशांची मागणी करत पैसे परत द्यावे यासाठी तगादा लावत होता. याच वादातून संतापलेल्या अतिकने चाँदचा काटा काढण्याचे ठरवले आणि दगडवाडी शिवारात डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही तासांच या हत्याकांडाचा छडा लावला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Beed Crime: पैशांवरून वाद, तरुणाकडून जिवलग मित्राची हत्या, डोक्यात दगड घालत जागीच संपवलं
Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com