शिवजंयतीलाच महाराजांचा पुतळा 'पडद्याआड'!बाया नाचवण्यासाठी महाराज पडद्यात

Shiv Jayanti 2026 Kolhapur Statue Controversy Details: शिवजयंतीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडद्याआड ठेवून लाज आणणारा प्रकार कोल्हापूरच्या वडणगे गावात घडलाय... मात्र नेमकं काय घडलंय...
Shivaji Maharaj statue reportedly covered with a curtain during a night cultural event in Wadange village, Kolhapur
Shivaji Maharaj statue reportedly covered with a curtain during a night cultural event in Wadange village, KolhapurSaam Tv
Published On

संपूर्ण जग शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांचा जयजयकार करतंय. पण ज्या मातीला शिवबांचा स्पर्श झाला, ज्या भूमीवर राजर्षी शाहू महाराजांनी समतेचं राज्य गाजवलं, त्याच कोल्हापुरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या प्रकाराने शिवभक्तांच्या तळपायाची आग मस्तकात जाणाराय. महाराणी ताराबाईंच्या या करवीर नगरीत, नर्तकींना नाचवण्यासाठी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका घाणेरड्या पडद्याने झाकण्याचं महापाप इथल्या ग्रामपंचायतीने केलंय. महाशिवरात्रीच्या नावाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचा बनाव रचत भरचौकात रात्रभर नर्तकींचा धिंगाणा सुरू होता... ज्या राजांच्या राज्यात स्त्रियांच्या पदराला हात लावण्याची कुणाची हिंमत नव्हती, त्याच राजांच्या समोर असा धिंगाणा घालण्यात आला.

या समोर नाचणाऱ्या तरुणीला पाहा... आणि तिच्या मागे असलेल्या त्या निळसर कपड्याकडे लक्ष द्या. त्या कपड्याआड राजांचा पुतळा झाकून ठेवण्यात आलाय. (पडदा झूम करा). महाराजांच्या समोर उभारलेल्या भव्य स्टेजवर लावणीच्या नावाखाली अश्लीलतेचा नंगा नाच सुरू होता. करवीर नगरीला काळिमा फासणारं कृत्य करूनही इथल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आपल्या या पापाचं समर्थन करत सारवासारव केलीये. याचं समर्थन करताना काय तर्क लढवण्यात आलेत ते तुम्हीच ऐका.

महाशिवरात्रीला शिवाची आराधना करायची सोडून, असं बिभत्स नाचाचं आयोजन करण्याची ही कुठली विकृत प्रथा या ग्रामपंचायतीने सुरू केली? असा प्रश्न उपस्थित झालाय. ज्या शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी-चोळी देऊन तिचा सन्मान केला, ज्यांनी हिरकणीच्या मातृत्वाचा गौरव करण्यासाठी गडावर बुरुज बांधला, अशा आदर्श राजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरमध्ये घडलेला हा प्रकार लाज आणणाराच.. असा धिंगाणा घालणाऱ्या शिवरायांचा अवमान करणाऱ्या या ग्रामपंचायतीला तात्काळ बरखास्त करून, या प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे. असं म्हटलं तरी अजिबात वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com