Sanjay Gaikwad News: संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा; विधानसभा अध्यक्षांकडे कुणी केली मागणी?

MLA Sanjay Gaikwad News: "आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेचे सदस्य आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अत्यंत खालचे शब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा", अशी मागणी सचिन खरात यांनी केली.
MLA Sanjay Gaikwad Latest News
MLA Sanjay Gaikwad Latest News Saam TV
Published On

MLA Sanjay Gaikwad Latest News

मंत्री छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घालून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असं विधान शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे अजित पवार गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. दुसरीकडे संजय गायकवाड यांनी आमदारकीच रद्द करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MLA Sanjay Gaikwad Latest News
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? स्वत:च केला दमानीयांच्या वक्तव्याचा खुलासा

"आमदार संजय गायकवाड (Mla Sanjay Gaikwad) यांनी विधानसभेचे सदस्य आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अत्यंत खालचे शब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन त्यांची आमदारकी रद्द करावी", असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटलं आहे.

"शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विधानसभेचे सदस्य आहेत. याच विधानसभेमध्ये नागरिकांच्या कल्याणासाठी कायदे बनवले जातात. मात्र, हेच संजय गायकवाड कायदा तोडणारी वक्तव्य करताना दिसत आहेत, त्यांच्या वक्तव्याची विधासभा अध्यक्षांनी गंभीर दखल घ्यावी", असंही सचिन खरात म्हणाले. (Latest Marathi News)

'मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाड यांना समज द्यावी'

संजय गायकवाड यांनी मा.ना.भुजबळसाहेब यांच्याबद्दल जे अश्लाघ्य व उर्मट वक्तव्य केले आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांच्या सातत्याच्या अशा वक्तव्यांनी बुद्धीहीन वैचारिकतेचे प्रदर्शन मांडले आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली.

आमदार गायकवाड यांच्या बुद्धीची कीव येते. असे लोकप्रतिनिधी सभागृहात असणे दुर्दैवच म्हणावे लागेल.तरी मुख्यमंत्री महोदयांनी संजय गायकवाड यांना 'समजेल'अशा भाषेत समज द्यावी, असं देखील चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

MLA Sanjay Gaikwad Latest News
Mumbai News: मुंबईत मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; वांद्रे परिसरातील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com