Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? स्वत:च केला दमानीयांच्या वक्तव्याचा खुलासा

Political News: ही माहिती त्यांना कशी काय मिळाली हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी साठी काम करत आहे, असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलंय.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam TV

Chhagan Bhujbal On Anjali Damania:

मंत्री छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला भुजबळांनी आता प्रत्युत्तर दिलंय. आपल्या पक्षात मला कुठलाही त्रास नाही आणि माझी येथे घुसमटही होत नाही, असं भुजबळांनी म्हटलंय.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : मनोज जरांगेएवढं ज्ञानी देशात दुसरं कुणी नाही, छगन भुजबळ यांचे विधान

माध्यमांशी संवाद साधताना पुढे त्यांनी म्हटलं की, मला अजुन याबाबत काही माहिती मिळालेली नाही. मात्र माझ्या आधी त्यांना ही माहिती कशी काय मिळाली हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसीसाठी काम करत आहे, असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलंय.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवरून देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संजय गायकवाड काय म्हणाले ते काल मी पण ऐकलं. मला पण ते एकूण वाईट वाटलं. जी भाषा त्यांनी काल वापरली ते बरोबर नाही. मी पण शिवसेनेत होतो, तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, अशा शब्दांत भुजबळांनी गायकवाडांना टोला लगावला आहे.

मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार...

संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं ते मुख्यमंत्री बघतील. मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. लाथ घालण्याची भाषा त्यांनी केली मात्र ते काही होऊ शकत नाही. कारण मी आनंद दिघे आणि मो.दा.जोशी या शिवसेनेच्या नेत्यांचे नेता म्हणून मी काम केलं आहे, असं भुजबळांनी म्हटलंय.

Chhagan Bhujbal
Dhule Crime: सोशल मीडियावर विवाहितेचा फोटो शेअर केल्याने वाद पेटला; हाणामारीत तरुणाचा खून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com