Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले

Buldhana Youth End Life Over Marriage Rejection: बुलडाण्यात दोन तरुणाने लग्न जुळत नसल्यामुळे आत्महत्या केली. लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे ते नैराश्येत होती. दोघांनी गळफास घेत आयुष्य संपवलं.
Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले
Buldhana Youth End Life Over Marriage RejectionSaam Tv
Published On

Summary -

  • बुलडाण्यात ५ दिवसांत दोन तरुणांची आत्महत्या

  • लग्न जुळत नसल्यामुळे नैराश्येतून उचललं टोकाचे पाऊल

  • एका तरुणाने घरात तर दुसऱ्याने झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

संजय जाधव, बुलडाणा

लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे बुलडाण्यात २ तरुणांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे राहणाऱ्या हरीश वानखेडे या तरुणाने लग्न जुळत नसल्याने आत्महत्या केली. तर दुसरी घटना बुलडाण्याच्या चिखली तालुक्यात मंगरूळ येथे घडली. याच कारणातून सत्यपाल भिसे या तरुणाने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात ५ दिवसांत दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावमध्ये राहणारा २८ वर्षीय तरुण हरीश वानखडेचे लग्न होत नव्हते. तो गेल्या अनेक वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत होता. पण लग्न जुळत नसल्यामुळे नैराश्येत येऊन या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले.

Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले
Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

हरिश वानखडेने घरातील सर्व सदस्य आपापल्या कामावर गेल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीय कामावरून घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता हरीश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हरीश हा भूमिहीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. हरिशचे वडील गेल्या २ ते ३ वर्षांपासून त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहत होते. पण गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते. याच नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले
Shocking: गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

तर दुसरी घटना अंढेरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिखली तालुक्यातील मंगरूळ गावात घडली. सत्यपाल भिसे या २५ वर्षीय तरुणाने सुद्धा लग्न जुळत नसल्याने व्यसनाधीन होऊन आत्महत्या घेतली. त्याने झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. सत्यपालच्या मित्राचे लग्न झाले होते. चांगले शिक्षण घेऊन देखील त्याला नोकरी मिळत नव्हती तसं लग्नसुद्धा जुळत नव्हते. त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले होते. या नैराश्यातून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून पोलिस तपास करत आहेत.

Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले
Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com