सुखी संसाराच्या स्वप्नांची क्षणांत राखरांगोळी; १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू

साताऱ्यातील कराड-चिपळूण मार्गावर येरफळे जवळ पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाटण तालुक्यातील नवदाम्पत्याचा मृत्यू झाला असून, लग्नाला केवळ १० दिवस झाले होते.
Karad Chiplun Highway
Karad Chiplun Highwaysaam tv
Published On

नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन संसाराची सुरुवात करणाऱ्या एका नवदाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे (ता. कराड) गावच्या हद्दीत पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अवघ्या दहा दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. राजू झोरे (वय 25) आणि राणी झोरे (वय 23) अशी मृतांची नावे असून, ते पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील रहिवासी होते.

Karad Chiplun Highway
Nashik TCS Case: आसिफ ऑफिसमध्ये माझ्या मांडीवरून हात फिरवायचा अन्...; नाशिक TCS प्रकरणात महिला कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, राजू आणि राणी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना कराड-चिपळूण मार्गावरील येरफळे हद्दीत हा अपघात झाला. समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात समोरून येणाऱ्या पिकअप गाडीशी दुचाकीची सामोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक तुटून दूर फेकले गेले आणि पिकअपच्या समोरच्या काचेचाही अक्षरशः चक्काचूर झाला.

Karad Chiplun Highway
HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

या अपघातात राजू आणि राणी या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या 10 दिवसांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. आनंदाचे वातावरण असलेल्या झोरे कुटुंबावर या घटनेमुळे दु: खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पाटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पिकअप चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com