MSRTC ST Bus : धक्कादायक! चक्क नवी कोरी एसटी बस गेली चोरीला, महाराष्ट्रात खळबळ, कुठे घडली ही घटना?

New ST Bus Stolen From Jamner : जळगाव जिल्ह्यातील जामनेर एसटी आगारातून मध्यरात्री नवी कोरी एसटी बस चोरीला गेल्याने खळबळ उडाली. शहापूरजवळ बसचे चाक पंचर झाल्यानंतर चोरट्यांनी ती रस्त्याच्या कडेला सोडून पलायन केले. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
New ST Bus Stolen From Jamner
New ST Bus Stolen From Jamner
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

brand new ST bus stolen from Jamner depot : जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून चक्क महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (ST Bus) नवी कोरी बसच चोरांनी चोरून नेल्याची धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. या अजब चोरीच्या प्रकारामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जामनेर आगारात उभी असलेली एक नवी कोरी एसटी बस मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिताफीने पळवून नेली. ऐन मध्यरात्री बस चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर आगार प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. चोरट्यांनी आगारातून बस नेली कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

New ST Bus Stolen From Jamner
शरद पवारांच्या खासदारांची मोदींकडे सर्वात मोठी मागणी, पंतप्रधानांचे आश्वासन, ३० मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

पंचरमुळे चोरट्यांचा प्लॅन फसला

बस चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरला आहे. पळवून नेलेली ही बस जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ पोहचली असता, तिचे एक चाक पंचर झाले. अचानक चाक पंचर झाल्यामुळे चोरट्यांची तारांबळ उडाली आणि पुढे जाणे अशक्य झाल्याने ते बस रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

New ST Bus Stolen From Jamner
जुना मित्र पुन्हा भाजपसोबत येणार? पक्षाच्या प्रमुखांनी घेतली मोदींची भेट, राजकारणात खळबळ

ग्रामस्थांची मोठी गर्दी, सुरक्षेचा गंभीर प्रश्न

आज सकाळी शहापूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिलेली ही लालपरी (एसटी बस) पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या वेळी थेट आगारातूनच बस चोरीला गेल्यामुळे जामनेर एसटी आगारातील सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com