Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Language Politics in Maharashtra Actor Slams Raj Thackeray: राज्यात हिंदी आणि मराठी भाषेवरुन वाद सुरू झालाय. उद्योगपती सुशील केडियाला अद्दल घडवल्यानंतर आता एका अभिनेत्यानं राज ठाकरेंना चॅलेंज केलंय
Language Politics in Maharashtra Actor Slams Raj Thackeray
BJP MP Dinesh Lal Yadav ‘Nirahua’ challenges critics over Maharashtra language row, says he won’t be forced out for not speaking Marathi.saamtv
Published On

महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून वातावरण तापलंय.याचदरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी राज ठाकरेंचे पक्ष कार्यकर्ते साम-दाम दंड- भेद याचा उपयोग करत आहेत. मात्र त्यादरम्यान परप्रांतियांकडून राज ठाकरेंवर टीका केली जातेय. उद्योगपती सुशील केडिया याच्यानंतर आता एका अभिनेत्यानं राज ठाकरेंना ओपन चॅलेज दिलंय.

मनोरंजन क्षेत्रात राज ठाकरे यांची मोठा दबदबा आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांना भेटत असतात. इतकेच नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे चित्रपट सेना देखील कार्यरत आहे. मात्र त्याच मनोरंजन क्षेत्रातून त्यांना चॅलेंज दिलं जात आहे. दोन दिवसापूर्वी सुशील केडिया नावाच्या उद्योगपतीने त्यांना डिचवलं होतं. राज ठाकरेंनी त्यांची गुंडगिरी बंद करावी असं केडियानं म्हटलं होतं. आता एका भोजपुरी अभिनेत्यानं त्यांना चॅलेंज दिलंय.

काय म्हणाला निरुहुआ

अभिनेता आणि भाजप नेते दिनेश लाल यादव अर्थात निरुहुआनं राज ठाकरेंना आव्हान केलंय. मी मराठी बोलत नाही, भले महाराष्ट्रातून बाहेर काढून टाका, असं थेट चॅलेंज त्याने दिलंय. देशात कुठेही असे घडू नये. हा देश त्याच्या विविध भाषा आणि संस्कृतींसाठी प्रसिद्ध आहे, तरीही तो या विविधतेमध्ये एकता राखतो. घाणेरडे राजकारण करणाऱ्या लोकांनी असे करण्यापासून दूर राहावे. सावधगिरी बाळगावी. मला मराठी येत नाही. जर तुमच्यात ताकद असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून लावा., असं ओपन चॅलेंज निरुहुआनं दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com