Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज साठ्यांचे ETS प्रणालीद्वारे होणार सर्वेक्षण

Chandrashekhar Bawankule News : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत ETS प्रणालीद्वारे दर तीन महिन्यांनी सर्वेक्षण करण्याची घोषणा केली आहे. मिरजमधील प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होणार आहे.
Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज साठ्यांचे ETS प्रणालीद्वारे होणार सर्वेक्षण
Chandrashekhar Bawankule NewsSaam Tv
Published On
Summary
  • अवैध गौण खनिज उत्खननावर सरकारची कडक भूमिका

  • ETS प्रणालीद्वारे दर 3 महिन्यांनी सर्वेक्षण

  • मिरजमधील प्रकरणाची चौकशी सुरू

  • कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणावर उत्खनन उघड

  • दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची अवैध उत्खनन आणि चोरी सुरु असल्याचं निदर्शनास आलं. हे अवैध उत्खनन आणि चोरी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील गौण खनिज साठ्यांचे दर तीन महिन्यांनी ईटीएस प्रणाली द्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन आणि पुरस्कार वितरण समारंभानंतर मंत्री बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अवैध्य माती उत्खननासंदर्भात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे ते यावेळेस म्हणाले.

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज साठ्यांचे ETS प्रणालीद्वारे होणार सर्वेक्षण
Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, कृष्णा नदीचे पात्र एक प्रकारे उडवण्याचा प्रकार झाला आहे. दोनशे ते तीनशे डंपरद्वारे अवैधरित्या माती उत्खनन केले गेले आहे. याप्रकरणात सात कोटींचा दंड लागू केलेला यातना, त्याच लोकांना पुन्हा माती उत्पन्नाचा परवाना देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज साठ्यांचे ETS प्रणालीद्वारे होणार सर्वेक्षण
Nida Khan : नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणातील HR निदा खान निघाली टेलीकॉलर

रस्ते आणि अन्य कामांसाठी गौण खनिजाची गरज लागते, त्यामुळे रीतसर गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली जाते. मात्र संबंधित तहसीलदार ज्याप्रमाणे रीतसर वैधपणे उत्खननाबाबत परवानगी देतात, त्याचप्रमाणे अवैध उत्खननवर कारवाई सुद्धा करणे गरजेचे असते आणि ते त्यांनी करणे आवश्यक आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान आता गौण खनिजाची अवैध उत्खनन आणि चोऱ्यांवर सरकारचे बारकाईने लक्ष राहणार आहे. या प्रणालीमुळे आता गौण खनिजाची अवैध उत्खनन होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com