भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

bjp mlc candidate list : भाजपकडून विधानपरिषदेसाठी एकूण ११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
Political news update
political news Saam tv
Published On
Summary

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज

भाजपकडून ११ उमेदवारांची यादी जाहीर

प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून उमेदवारी जाहीर

राज्यातील विधानपरिषदेच्या १६ जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने ११ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. ११ जणांच्या यादीत प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने पत्रक काढत उमेदवारांची नावांची जाहीर केली.

राज्यात विधानपरिषदेच्या एकूण १७ जागा रिक्त झाल्या आहेत. त्यातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपमधील अनेक इच्छुकांनी जोरदार कंबर कसली होती. इच्छुकांनी उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठांच्या भेटी घेतली होती. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी चुरस वाढली होती.

भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा थेट दिल्लीतून झाली. उमेदवारांच्या नावाची यादी निश्चित करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. खरंतर राज्यात झालेल्या बैठकीत ४८ जणांची नावे निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर नावांची यादी भाजपच्या अध्यक्षांकडे सोपवण्यात आली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली.

Political news update
Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या गोरेगाव परिसरातील ओढ्याला अवकाळी पावसामुळे पूर

उमेदवारांची नावे

सोलापूर – राजेंद्र राऊत

अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे

छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट

नांदेड – अमर राजूरकर

धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील

भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर

अमरावती – प्रविण पोटे पाटील

सांगली-सातारा – धैर्यशील कदम

जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन

नागपूर – डॉ.राजीव पोतदार

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखानी

Political news update
निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

ठाणे विधानपरिषदेकरिता शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना पुन्हा संधी

गेल्या काही दिवसांपूर्वीच हितेंद्र ठाकूर रवींद्र फाटक यापैकी कुणाला ठाणे विधानपरिषदेची संधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रममध्ये रवींद्र फाटक यांना अर्ज देण्यात आला आहे. ते उद्या दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत रस्सीखेच सुरू असतानाच सेनेचे रविंद्र फाटक हे उमेदवार ठरले आहेत. ते उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com