

हिंगोलीच्या गोरेगाव परिसरातील कडोळी गावाच्या जवळ असलेल्या तपोवन रोडवरील ओढ्याला अवकाळी पावसामुळे चक्क पूर आला आहे
या ओढ्याला पूर आल्यामुळे अर्धा तास कडोळी ते गोरेगाव रस्त्यावरील वाहतूक देखील बंद झाली होती
तासाभरापासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे
सध्या वातावरणात प्रचंड उखडा असल्याने या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या पेरणीपूर्वीचे मशागत पूर्ण होण्याआधीच शेतात पाणी साचले आहे
हिंगोली -
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस
वादळी वारे आणि गारांचा पाऊस कोसळत आहे
सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, सवना, कडोळी, माझोड परिसरात अवकाळी पाऊस आणि गारा कोसळल्या आहेत
तर अवकाळी पावसात आता पर्यंत वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे, वीज कोसळल्याने एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे
वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट
वाशिम तालुक्यातील तोंडगाव फाटा परिसरात आज सायंकाळी सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पाऊस झाला आहे.
तर अनसिंग परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांविरोधात अमरावती शहरात युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले, कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचे सांगत पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करावेत, अशी मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे केलेले आवाहन
जगदगुरू संत तुकोबांच्या देहूनगरीत कमला एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.. देहूतील मुख्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला रंगीबेरंगी आकर्षक देशी-विदेशी सुगंधी फुलांची देखणी सजावट करण्यात आली असून या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.. आज भाविकांनी मुख्य मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या मनमोहक रुपाचे दर्शन घेत भक्तिभावाने नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला. तर संत तुकोबांच्या शिळा मंदिरालाही आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून मंदिर परिसर अधिकच देखणा आणि प्रसन्न दिसत आहे.. कमला एकादशी निमित्त देहूत सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून वारकरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात भक्तिरसात तल्लीन झालेले दिसत आहेत.भक्ती,श्रद्धा आणि फुलांच्या सुगंधाने भारावलेल्या देहूनगरीचा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत..
शहरातील मिरावली पहाडच्या पायथ्याशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक....
दरोड्याच्या तयारीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 5 जणांना केली अटक...
आरोपीकडून 4 पिस्टल, 10 जिवंत काडतूसे, 1 कोयता,1 चाकूसह एकूण 2 लाख 76 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
यामध्ये मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर,समर्थ दूधभाते, आणि आकाश पवार या आरोपीचा समावेश आहे....
यामध्ये समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते या दोघावर पुणे शहरात खुणाचा प्रयत्न, मकोका, शस्त्र बागळने यासाह अनेक गुन्हे आहे दाखल
कांदा खरेदीला 15.80 रेट कालच केला
कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही
मेहेकर तालुक्यातील जनुना व चिंचाळा ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय.. कामात अनियमितता, दूषित पाणीपुरवठा आणि अपूर्ण कामांच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समिती मेहकर कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले. ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत जलजीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत पाईपलाईन कामांमध्ये त्रुटी व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केलाय. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर पंचायत समिती व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. संबंधित गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविणे व अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
10 दिवसात सकारात्मक निर्णय होईल- अमित शाह यांचे आश्वासन
राज्य सरकार आणि केंद्रसरकारची बैठक संपन्न
हवामान खात्याकडून आज आणि उद्या जालना जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट...
आज दिवसभर तीव्र ऊन बघायला मिळालं.मात्र सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला..
यंदा होऊ घातलेल्या रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला जालना जिल्ह्यातून जवळपास 10 हजार पेक्षा अधिक शिवभक्त जाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, मागच्या पंधरा दिवसापासून या संदर्भात नियोजन सुरू होतं. मूळ वाटी आणि बेशरमाचं फुल दाखवत शिवराज्याभिषेक सोहळ्याच निमंत्रण संभाजी भिडे यांना देण्यात आलं शिवाय संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल तर यानंतर दिसेल तिथे त्याला थेट चोप देऊ असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वाढत्या महागाईवरून कॉँग्रेसचे टिळक भवनसमोर आंदोलन
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक अपडेट
उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस
एकूण 16 उमेदवारांनी खरेदी केले 40 अर्ज
एकही उमेदवाराने भरला नाही अर्ज
विधान परिषदची जागा शिवसेनेला मिळावी अशी संपूर्ण कोकणाची मागणी आहे. कोकणात शिवसेनेची सदस्य संख्या अधिक असल्याने मागणी करण काही चुकीच नाही अस सांगताना मंत्री भरत गोगावले यांनी शिवसैनिकांच्या मागणीच समर्थन केल आहे. मात्र निर्णय युतीचे नेते घेतील अस देखील गोगावले म्हणाले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य करत काही लोकांनी अतिरिक्त साठा केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला दुजोरा देत एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यामध्ये 31 टक्के अतिरिक्त डिझेल विक्री झाल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितलय.
लातूरच्या उदगीर येथील तोंडार पाटी जवळ एका दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, या आगीत मोठ नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत, तर ही, आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अस्पष्ट आहे .
समृद्धी महामार्गावर कारने घेतला पेट...
चालत्या इलेक्ट्रिक कारने अचानक घेतला पेट...
सिन्नर तालुक्यातील वावी शिवारातील घटना...
इलेक्ट्रिक कार पूर्णतः जळून खाक...
सुदैवाने जीवितहानी नाही.
कार चालक योगेश घुगे वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली...
कारने तांत्रिक बिघाडामुळे की उष्णतेमुळे पेट घेतला? कारण अस्पष्ट...
सिन्नरहून शिर्डीकडे निघालेल्या घुगे यांची इलेक्ट्रिक कार जळून खाक...
आपत्कालीन यंत्रणेला फोन केल्यानंतर एक तास उशिराने मदत पाहचली...
वाहनचालकांमध्ये नाराजी.
- मंत्रालय मुंबई अशा पद्धतीचा संदेश अलार्म वाजून प्रत्येक मोबाईच्या स्क्रीनवर झळकला आहे संदेश .
- त्यामुळे अचानकपणे सर्वांचे मोबाईल वाजू लागल्याने ही लाट उष्णतेची किती भयंकर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असाही संदेश हाय अलर्ट पद्धतीने या संदेशाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
- अचानकपणे मोबाईलवर टोन वाजत हा मेसेज आल्याने काहींना भीती सुद्धा निर्माण झाली आहे.
पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत, पक्षामध्ये आपल्या राजीनामाची कोणतीही चर्चा झालेली नाही,या केवळ माध्यमात चर्चा असून यासर्व पेरलेल्या बातम्या आहेत,असा खुलासा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून आमदार इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सूचना पार्थ पवार आणि पक्षाकडून देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत,मात्र नायकवडींनी सर्व चर्चांचे खंडन करत पक्षाच्या बैठकीत देखील अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही,त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही,असे स्पष्टीकरण दिलं आहे.
नीट पेपर होण्यापूर्वीच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न
डॉ प्रल्हाद कुलकर्णी ची मदत घेऊन शिरुरे ने २ विद्यार्थ्यांना दिले प्रश्न
कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे... आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एक नवा मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे गोकुळ दूध संघाने घेतलेले हलाल सर्टिफिकेट.मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी या सर्टिफिकेटवरून प्रश्न उपस्थित केले आहेत... तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आखाती देशांमध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्यात करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते असे सांगितले आहे. मात्र या मुद्द्यावरून आता राजकीय, धार्मिक आणि व्यावसायिक असा तिहेरी वाद निर्माण झाला आहे.
नंदुरबारमध्ये शून्य सावली दिवसाचा अनोखा अनुभव...
सूर्य थेट डोक्यावर, काही क्षणांसाठी सावली झाली गायब....
नक्षत्र छंद मंडळाकडून शून्य सावली दिवसाचे निरीक्षण...
विद्यार्थी आणि नागरिकांनी अनुभवली दुर्मीळ खगोलीय घटना...
शून्य सावली दिवसातून विज्ञान-खगोलशास्त्र जनजागृतीचा प्रयत्न....
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा 30 मे पासून अंतरवाली अंतरवाली सराटी मध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलन न करण्याची विनंती केली होती. त्यावर जरांगे यांनी 28 मे पर्यंत सरकारला लाड यांच्या माध्यमातून समाजाच्या मागण्या ठेवत अल्टिमेटन दिला होता.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.रिलस्टार विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.अज्ञात कारणावरून हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाक घरातील पत्र्याच्या लोखंडी अंगलला दोरीच्या साहाय्याने रिलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25 )हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे.
कांद्याचे कोसळलेले भाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेय
अमेरिका इराणच्या युद्धामुळे राज्यामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी ट्रॅक्टर चालकांना रात्रभर रांगेत उभे राहावे लागत आहे. डिझेल मिळत नसल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला अडथळा निर्माण होऊ लागला आहे या सर्वांना कंटाळून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथील शेतकरी बांधवांनी बैल जोडीच्या सहाय्याने पेरणीपूर्व मशागत करण्यास सुरुवात केली आहे.
- मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन
- आगामी संस्था कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोडमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन
- रिंग रोडची अलाइन्मेंट बदलण्याची मागणी, प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप
- आंदोलनाच्या पार्श्वभूमी भुजबळांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात
- मंत्री छगन भुजबळ मुंबईत असणे तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच आंदोलन
० मुबंई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
० माणगांव बाजारपेठ ते खरवली फाट्या पर्यत वाहनांच्या रांगा
० कोकणात जाणाऱ्या मार्गावर जवळपास चार किलोमीटर पर्यत वाहतूक कोंडी
० कोकणात फिरण्यासाठी निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीत आडकले
अमरावतीत स्कूलबस- व्हॅनच्या मासिक शुल्कात तब्बल 25 टक्क्यांनी दरवाढ
अमरावती चालक-मालक वाहतूक संघटनेचा निर्णय
विद्यार्थी आणि पालकांना बसणार आर्थिक फटका
पुण्यातील आणखी एक महिला प्राध्यापक सी बी आय च्या रडारवर
पुण्यातील आणखी एक केमिस्ट्री विषयतज्ञ रडारवर
संबंधित महिला प्राध्यापक एन टी ए मधील समिती मध्ये केमिस्ट्री विषय तज्ञ असल्याची माहिती
या महिला प्राध्यापकाला सी बी आय कडून अटक केली जाण्याची शक्यता
नाशिकच्या येवला तालुक्यातल्या विखरणी गावात पाण्याअभावी शेतकऱ्यावर स्वतःची डाळिंब बाग उपटून टाकण्याची वेळ आली आहे.
दोन वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग लागवड केली होती.
रोपे, तार, काठ्या आणि इतर साहित्यावर त्यांनी मोठा खर्च केला होता.
गेल्या वर्षी या बागेतून त्यांना सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
मात्र, वाढते ऊन, प्रचंड उष्णता आणि घटलेले जलस्रोत यामुळे डाळिंबाची झाडे वाळू लागली. अखेर कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपूर्ण डाळिंब बाग उपटून टाकली.
० विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज
० विकास गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला उमेदवारी अर्ज
० कोकणच्या विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक
० राष्ट्रवादीकडून भुमिका स्पष्ट होत नसली तरी विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात महिला आणि बालविकास विभागाच्या सर्वेक्षणातून तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. यातील काही मुलींची प्रसूती देखील झाल्याचे उघड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे..
परळी शहरात शिंदे सेनेच्या शिवाजी शिंदे वरिष्ठ नेत्यावर शहराच्या मोंढा परिसरात एका हॉटेल वरती पत्नीसोबत असताना काही अज्ञात हल्लेखोर आले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला या हल्ल्यात शिवाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी स्वा.र.ती रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे या सर्व प्रकरणाचा परळी संभाजीनगर पोलीस तपास करत आहेत.
अधिकमासातील कमला एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात. विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपुर पर्यंत जाऊन पोहोचले असून संपूर्ण मंदिर आज फुलांनी सजवण्यात आले आहे. पुरुषोत्तम अधिक महिन्यातील पर्वकाळाचा दिवस म्हणून एकादशीचा सोहळा समजला जातो.
- महामार्गावर राजूर बहुला परिसरात ७५ वर्षीय महिलेला कारने उडवलं, २४ मे रोजीची घटना
- हिट अँड रनची घटना परिसरातील पेट्रोप पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- रस्त्याच्या कडेने डोक्यावरून हंडा घेऊन जाणारी महिलेला भरधाव कारने उडवलं
पुण्याच्या खेड तालुक्यात जनगणना प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या ९ शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी खेड पोलीस ठाण्याला पत्र दिलय जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामाला प्राधान्य न देणाऱ्या शिक्षकांमध्ये पती-पत्नीचाही समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय
सह्याद्रीच्या कुशीत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही भिमाशंकर आणि कोंढवळ परिसर आजही भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. या कायमस्वरूपी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुर्गम डोंगरकड्यांवरून दुचाकीवर प्रवास करत कोंढवळ अभयारण्यात प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
खेड शहरातील खारी गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली एक वृद्ध महिला पाण्यात बुडत असल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र स्थानिक युवक स्वयंम शिबे यांने प्रसंगावधान राखत धाडसी पाऊल उचलले आणि वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळवले. महिला पुलाखालील खोल पाण्यात अडकून बुडत होती. ही बाब स्वयंम शिबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ खाडीमध्ये उडी घेतली. पाण्याचा वेग आणि खोली अधिक असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले.
डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला जमीन देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता राजकीय श्रेयवाद रंगू लागला आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील नेते हा निर्णय आपल्या पक्षाच्या प्रयत्नांमुळे झाल्याचा दावा करत असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.