निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

Gokul Milk Union Faces Halal Controversy Before Polls: गोकुळच्या निवडणुकीआधीच हलाल सर्टिफिकेटवरून वादाला तोंड फुटलयं... मात्र निव़डणुकीआधी हलालचं राजकारण नेमकं कसं सुरु झालं? हलाल प्रमाणपत्र नेमकं कशासाठी? आणि हलाल सर्टिफिकेटवरून विरोधकांनी मुश्रीफांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कसा केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Halal certification row intensifies political tensions ahead of the Gokul Milk Union elections in Kolhapur.
Halal certification row intensifies political tensions ahead of the Gokul Milk Union elections in Kolhapur.saam tv
Published On

कोल्हापूरच्या राजकारणात सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. त्यातच आता गोकुळ दूध संघाच्या हलाल सर्टिफिकेटवरुन नवा वाद पेटलाय. हलाल सर्टिफिकेटच्या मुद्द्यावरून याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी आखाती देशांमध्ये गोकुळच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी इस्लामिक एजंट कार्यरत असल्याचा आरोप केलाय...

दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. नवीद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष असताना 2022 मध्येच हलाल सर्टिफिकेट घेतलं असल्याचं स्पष्ट करत हे सर्टिफिकेट मुस्लिमबहुल राष्ट्रामध्ये निर्यातीसाठीच्या नियमांचा भाग असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.मात्र हलाल प्रमाणपत्र नेमकं का घेतलं जातं? हे प्रमाणपत्र असलेलीच उत्पादन आखाती देशात का आयात केली जातात? पाहूयात...

हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय?

'हलाल' हा एक अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ 'वैध' किंवा 'इस्लामी नियमांनुसार परवानगी असलेला' असा होतो. इस्लामिक नियमांनुसार तयार आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना मिळणारं अधिकृत प्रमाणपत्र म्हणजे हलाल प्रमाणपत्र... आखाती देशांमध्ये उत्पादनांची निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर असतं...उत्पादनात अल्कोहोल किंवा डुकराचं मांस यांसारख्या प्रतिबंधित घटकांचा अभाव असल्याची ही पावती असते..जगभरातील मुस्लिम ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी उत्पादनावर 'हलाल' मुद्रा असणं महत्त्वाचं असतं... त्यामुळे हलाल प्रमाणपत्रामुळे निर्यात वाढीस मदत होऊन उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होते...याआधीही अनेक कंपन्यांनी आखाती देशामधील व्यापारासाठी हलाल सर्टिफिकेट घेतलयं....

गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट लागू केली असली तरी येऊ घातलेल्या गोकुळच्या निवडणुकीत दूध संघाच्या कारभारापेक्षा हलाल सर्टिफिकेटचाच मुद्दा केंद्रस्थानी येणार असं चित्र आहे. त्यामुळे हलालवरुन राजकारण थांबवण्यासाठी मुश्रीफ गट कोणती रणनीती आखणार? हे पाहणं महत्वाचं असेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com