Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Operation Tiger Impact: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकर यांना मोठा धक्का दिला. त्यांच्या ऑपरेशन टायगरला यश आले. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार
Omraje NimbalkarSaam Tv
Published On
  • ओमराजे निंबाळकर यांचा मोठा निर्णय

  • कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदेसेनेत जाण्याबाबत घेतला निर्णय

  • विकासकामांसाठी सत्तेत जाणे गरजेचे असल्याचा दावा

  • उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट केलं

सचिन जाधव, साम टीव्ही

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 'जय महाराष्ट्र' करून शिवसेना शिंदे गटात जाणार असून ते लवकरच निर्णय जाहीर करू शकतात. शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कार्यकर्ते यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. निर्णय झाला, घोषणा बाकी असून 'खिचके के ताण धनुष्यबाण' अशी स्तिथी आहे. ओमराजे यांनी कार्यकर्ते यांना तयारीला लागा असे आदेश दिले असून कार्यकर्ते यांना पाठीशी उभे राहत साथ द्या अशी विनंती केली. डॉ. पाटील परिवाराची सत्ता, विकास कामे ही कारणे आहेत.

ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत असे सांगितले की, 'स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवल्या मात्र त्यात यश आले नाही, सत्तेची आणि आर्थिक ताकत ही त्यांच्यासोबत आहे. आपण ज्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात आलो ते काँग्रेस सरकार असताना तिथे होते, भाजप सरकार आले की तिथे त्यांच चालूच आहे. आपण कमी संसाधनात कुठपर्यंत लढायचे. आपण सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमन केले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. बऱ्याच कार्यकर्त्यांसोबत माझी चर्चा झाली.'

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार
Operation Tiger: ठाकरे शिंदेंना धक्का देणार, ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी धडपड; आज चित्र होणार स्पष्ट

त्यांनी पुढे असे सांगितले की, शेतकऱ्यांचा साधा ट्रान्सफार्मर दुरुस्त करायचा असेल तर निधी नाही, दरवर्षी इस्टीमेट तयार करायचे व निधी नाही. पाटील परिवार सत्तेत आहे, स्वतः आमदार, पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आपण वेड्यासारखं बघत राहायचे आपण सुद्धा सत्तेतील नेतृत्व स्वीकारले पाहिजे. भाजप शिवसेनासह ४ पक्ष चालवत आहेत. या सगळ्या बाबीचा विचार करावा लागेल. कार्यकर्ते यांची बिले अडवली जात आहे.

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार
Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...

तसंच, '२० वर्षांनंतर कोणच आरोपी नाही, सगळेच निर्दोष आहेत, कोर्ट म्हणत आहे की राजकीय शत्रूत्व आहे उद्देश आहे पण सगळे निर्दोष. मी स्वतः खासदार असताना मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तर इतरांचे काय ? प्रत्येक जण म्हणत आहे, तुमची प्रतिमा व महाराष्ट्रात नाव आहे. मी प्रतिमा सांभाळायला खासदार बनलो आहे का, या लोकांना धडा शिकवण्यासाठी झालो आहे. निकाल विरोधात गेल्यावर एकनाथ शिंदे हे तात्काळ गृहमंत्री यांना बोलले, मला पाठबळ दिले. निकाल लावायसाठी गेलो नाही.', असे ते म्हणाले.

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार
'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

ओमराजे यांनी या बैठकीत मनातील खदखद बोलून दाखवली. ते म्हणाले, 'साध्या साध्या गोष्टी होत नाहीत, मी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी राहा, तुमची त्यासाठी नितांत गरज आहे अशी विनंती केली. जिल्हा परिषद, नगर परिषद सारखे लोकसभा व विधानसभावेळी झाले तर त्यांचीच सत्ता येईल. अनेक जण म्हणतात की मी त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे त्यासाठी निर्णय घेत आहे. माझी भुमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, त्या कुटुंबाला मतदान करा असे मी म्हणणार नाही, त्यांच्यासाठी मत मागणार नाही.'

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार
Operation Tiger: ठाकरे गट की शिंदे गट? बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com