एकनाथ शिंदे यांची विदर्भात ताकद वाढली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

eknath shinde news : एकनाथ शिंदे यांची विदर्भात ताकद आणखी वाढणार आहे. विदर्भातील बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समीकरण बदलणार आहे.
shivsena
eknath shindeSaam tv
Published On

काँग्रेसला मोठा धक्का बसलाय

साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर वाढता विश्वास

शिवसेनेत राज्यभरातून प्रवेशाचा ओघ सुरूच

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला आज रविवारी मोठा धक्का बसलाय. विधानपरिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांनी शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. साहेबराव कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे यवतमाळमधील राजकीय समीकरण बदलणार आहे.

साहेबराव कांबळे यांनी एका आयोजित सोहळ्यात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'साहेबराव कांबळेंनी विकासाला प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे उमरखेड-महागाव मतदारसंघात शिंदेसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. या विधानसभा निवडणुकीत तब्बल ९३ हजार मते मिळवणारे साहेबराव कांबळे हे प्रभावी नेते आहेत. त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होईल'.

shivsena
महायुतीत मतभेद आहेत का? दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं! जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य

'मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव कांबळे यांनी विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलं. ते शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

'संजय राठोड हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासह दुष्यंत चतुर्वेदी हेदेखील पक्षाकडून बिनविरोध निवडून आले आहेत. साहेबराव कांबळे यांच्यासारखे तडफदार कार्यकर्ते पक्षात आल्याने त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम आम्ही करू," असे शिंदे यांनी सांगितले.

shivsena
महायुतीत मतभेद आहेत का? दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं! जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य

'पीक विमा, वीटभट्टी कामगार भगिनींना शासकीय योजनांचा लाभ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी, विविध विकासकामांना गती देण्यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असेही आश्वासन शिंदे यांनी दिले. 'स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री, आमदार आणि शासन यंत्रणा समन्वयाने काम करेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com