Shocking VIDEO : धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; तरुणाच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Beed Mobile Selfi Death Video : बीडमध्ये धावत्या दुचाकीवर सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे.
धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; तरुणाच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
Beed Bike Mobile Selfi Death VideoSaam TV
Published On

वाहने चालवताना मोबाइलचा वापर करू नका, असं वाहतूक पोलीस वारंवार सांगतात. पण काहीजण याकडे सर्रास दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात. परिणामी अपघाताच्या मोठमोठ्या घटना घडतात. अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे. धावत्या दुचाकीवर सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू झालाय.

धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; तरुणाच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
Mumbai Accident VIDEO: मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव पिकअपने दोन विद्यार्थ्यांना उडवलं; एकाच जागीच मृत्यू

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे. या घटनेत दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास परिसरात घडली आहे.

अपघातातील मृत आणि जखमी तरुण दोघेही जालना (Jalna News) जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं कळतंय. या तरुणांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघाताची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सोलापूर-धुळे महामार्गावर सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. अशातच दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांनी सेल्फी घेण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे. यातील एक तरुण जागीच ठार झाला असून दुसऱ्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कार अपघातात तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील धुळे-सोलापूर महामार्ग रस्त्यावर एका भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. माळीवाडा-फातियाबाद परिसरात ही अपघाताची घटना घडली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

धावत्या दुचाकीवर सेल्फी काढायला गेला अन् धाडकन पडला; तरुणाच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
Pune Crime News : पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com