Pune Crime News : पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ

Pune Women Police News : ण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना शहरातील बुधवार चौकात घडली.
पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ
Pune Women Police NewsSaam TV
Published On

वाहन अडवल्याच्या कारणावरून पुण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना शहरातील बुधवार चौकात शुक्रवारी (ता. ५ जुलै) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ
Pune Crime: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, डॉक्टरने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; पाहा VIDEO

या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास शहरातील बुधवार चौकात पोलीस (Pune Police) वाहतुकीचे नियमन करीत होते. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने संशयावरून एका वाहनाला अडवले.

या वाहनचालकाने त्यांच्यासोबत बाचाबाची केली. इतकंच नाही, तर त्याने एकाने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर फेकले (Crime News). परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले.

'आमचा पुनर्जन्मच झाला आहे. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. एक तासभर तरी मला बोलता आले नाही', अशी प्रतिक्रिया संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याने दिली. या संदर्भात आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कठोरता कठोर कारवाई करा, असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर तीन वाहने एकमेकांना धडकली; भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com