VIDEO: बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढलं

Munde Activist Aggressive: आमदार संदीप क्षीरसागर गावामध्ये येताच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
VIDEO: बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढलं
Beed News saam tv

विनोद जिरे, बीड

बीडमध्ये मुंडे समर्थक (Beed Munde Activist) आक्रमक झाल्याची बातमी समोर आली आहे. आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांची कार येताच मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना गावातून बाहेर काढले. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हिंगणी (खुर्द) गावामध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मुंडे समर्थकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. बीडच्या हिंगणी (खुर्द) गावात संदीप क्षीरसागर गेले असताना मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी गेली. गावामध्ये संदीप क्षीरसागर यांची कार येताच मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांची घोषणाबाी केली.

VIDEO: बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढलं
Pune Accident VIDEO: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं

'पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है!', 'महाराष्ट्राचा एकच ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब' अशा प्रकारच्या घोषणा मुंडे समर्थकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कारसमोर दिल्या. यावेळी मोठ्यासंख्येने मुंडे समर्थक एकत्र आले होते. यावेळी घोषणाबाजी करत मुंडे समर्थकांनी संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेरून काढले. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO: बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढलं
Chhatrapati Sambhaji Nagar : साहेबांना रंग आवडला नसल्यानं टाईल्स फोडल्या; छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार

आमदार संदीप क्षीरसागर हे बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काल रात्री साडेआठच्या दरम्यान गावाला भेट देत दौरा करण्यासाठी आले होते. यादरम्यान ते हिंगणी (खुर्द) येथे आले असता त्यांना मुंडे समर्थकांनी विरोध दर्शवला. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. या घोषणा देत त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.

VIDEO: बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक, घोषणाबाजी करत संदीप क्षीरसागर यांना गावाबाहेर काढलं
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com