Chhatrapati Sambhaji Nagar : साहेबांना रंग आवडला नसल्यानं टाईल्स फोडल्या; छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार

Chhatrapati Sambhaji Nagar municipal corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार समोर आलाय. महापालिकेत नव्या कोऱ्या टाईल्स फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
साहेबांना रंग आवडला नसल्यानं टाईल्स फोडल्या; छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार
Chhatrapati Sambhaji NagarSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार समोर आला आहे. साहेबांना रंग आवडला नसल्यानं महापालिकेतील इमारतीच्या नव्या टाईल्स फोडल्या आहेत. या इमारतीत तीन महिन्यांपूर्वी बसवलेल्या टाईल्स फोडण्यात आल्या आहेत. तर त्या ठिकाणी नव्या टाईल्स बसवल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितली.

आले साहेबांच्या मना, तिथे कुणाचेही चालेना, अशी प्रचिती संभाजीनगर महापालिकेत आल्याची चर्चा जोरात सुरू आहे. महापालिका मुख्य इमारतीमधील जिन्यावर लावलेल्या टाइल्सचा रंग आयुक्त साहेबांना आवडला नाही, त्यानंतर या इमारतीमधील नव्या कोऱ्या बसवलेल्या टाईल्स फोडल्या आहेत. यानंतर आता त्या ठिकाणी नव्या टाईल्स लावल्या जाणार आहेत. याबाबत अधिकारी समोर येऊन बोलयाला तयार नाहीत.

साहेबांना रंग आवडला नसल्यानं टाईल्स फोडल्या; छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार
Gaja Marne: निलेश लंके यांचा सत्कार करणारा गजा मारणे आहे तरी कोण?, कारनामे ऐकून चक्रावून जाल

करवसुलीसाठी नागरिकांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या दालनांच्या सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च केले जात आहे. त्यात साहेबांना रंग आवडला नाही म्हणून नव्या टाईल्स फोडण्यात आल्याने जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही का? अशी चर्चा लोकांमध्ये सुरु आहे.

दरम्यान, पालिकेचे दालन आणि इमारतीचे सुशोभीकरणासाठी सात कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले. त्यात आयुक्तांचे दालन, नवीन हॉलचा देखील समावेश आहे. या कामासाठी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या जिन्याच्या पायऱ्यावर टाईल्स बसवण्यात आल्या आहेत.

साहेबांना रंग आवडला नसल्यानं टाईल्स फोडल्या; छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अजब कारभार
Manoj Jarange Patil: 'पुन्हा धोका दिला तर, विधानसभेत...,' मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा

जिन्याच्या भिंतीच्या दोन्ही बाजूंनाही टाईल्स लावण्यात आल्या आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वीच हे काम पूर्ण करण्यात आलं आहे. काम निकृष्ट झाल्याने यातील अनेक टाईल्स गळून पडत होत्या. ही बाब पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी हा प्रकार दररोज नजरेस पडत होती. त्यानंतर गुरुवारी अचानक कंत्राटदाराने टाईल्स फोडण्यास सुरुवात केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com