Gaja Marne: निलेश लंके यांचा सत्कार करणारा गजा मारणे आहे तरी कोण?, कारनामे ऐकून चक्रावून जाल

MP Nilesh Lanke Meets Gaja Marne: खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट घेतली. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. निलेश लंकेवर सध्या टीकेची झोड सुरू आहे.
Gaja Marne: निलेश लंके यांचा सत्कार करणारा गजा मारणे आहे तरी कोण?, होतेय जोरदार चर्चा
MP Nilesh Lanke Meets Gaja MarneSaam TV
Published On

नितीन पाटणकर, पुणे

अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी आज पुण्यातील गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतली. या भेटीमुळे निलेश लंके सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये साडपले आहेत. निलेश लंके हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी गजा मारणेने त्यांचा सत्कार देखील केला. या भेटीचे व्हिडीओ गजा मारणे याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्यानंतर ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागले आहेत. या भेटीमुळे निलेश लंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

गजा मारणे हा कुप्रसिद्ध गुंड आहे. निलेश लंकेंनी अशा गुंडाची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील गजा मारणेची भेट घेतली होती. तेव्हा देखील या भेटीवरून वादाला तोंड फुटले होते. या भेटीवरून जोरदार टीका करण्यात आली होती. आता निलेश लंके यांच्यावर देखील टीकेची झोड सुरू आहे. हा गजा मारणे नेमका कोण आहे त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

Gaja Marne: निलेश लंके यांचा सत्कार करणारा गजा मारणे आहे तरी कोण?, होतेय जोरदार चर्चा
Nilesh Lanke: ब्रेकिंग! खासदार निलेश लंके यांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; VIDEO समोर येताच सत्ताधारी आक्रमक

गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. गजा ⁠मारणेचे नाव गजानन मारणे असे आहे. गजा मारणेचे मुळ गाव पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये आहे. गजा मारणे हा स्वत: गुंड असून त्याची स्वत:ची मारणे टोळी आहे. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गजा मारणे हे नाव खूपच प्रसिद्ध आहे. गजा मारणेवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. पप्पू गावडे, अमोल बधे हत्या प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. हत्या प्रकरणात गजा मारणेला न्यायालयाने शिक्षा देखील ठोठावली होती.

Gaja Marne: निलेश लंके यांचा सत्कार करणारा गजा मारणे आहे तरी कोण?, होतेय जोरदार चर्चा
VIDEO Pune Bus fire : धुराचे लोट अन् प्रवाशांचा आरडाओरडा; धावती बस अचानक पेटली, भयंकर आगीची घटना कॅमेऱ्यात कैद

गजा मारणे ३ वर्षे पुण्यातील येरवडा कारगृहात होता. त्यानंतर त्याची रवानगी नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात करण्यात आली होती. ⁠गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का अंर्तगत देखील कारवाई झालेली आहे. ⁠तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणे टोळीने त्याचे जल्लोषात स्वागत केले आणि तळोजापासून पुण्यापर्यंत रोड शो काढला होता. रोड शो केल्याप्रकरणी गजा मारणेवर नवी मुंबईपासून पुण्यापर्यंत अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ⁠गजा मारणेवर अलिकडच्या काळातील गंभीर गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. खंडणी आणि अपहरणाचा हा गुन्हा आहे. या गुन्ह्यात गजा मारणेवर मोका देखील लावण्यात आला आहे.

Gaja Marne: निलेश लंके यांचा सत्कार करणारा गजा मारणे आहे तरी कोण?, होतेय जोरदार चर्चा
Pune Accident : वर्षश्राद्ध करून घरी परतताना काळाचा घाला, माजी उपसरपंचाचा अपघाती मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com