Sangli Politics: सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने? जयंत पाटलांचा विशाल-विश्वजित कदमांना इशारा?

NCP vs Congress In Sangli: सांगलीत विशाल पाटील-विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांचा संघर्ष काही थांबायला तयार नाही. जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन विश्वजीत कदमांनी खुलं आव्हान दिल्यानंतर आता जयंत पाटलांच्या समर्थकांनी निर्वाणीचा इशारा देणार रिल शेअर केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध मविआ संघर्ष पाहायला मिळणार की काँग्रेस विरूद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी...यावरचा हा रिपोर्ट
Sangli Politics: सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने? जयंत पाटलांचा विशाल-विश्वजित कदमांना इशारा?
NCP vs Congress In Sanglisaam

लोकसभेत सांगलीच्या जागेवरुन मविआत वाद झाला होता. यात काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत विजय मिळवला. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत.. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक काही महिन्यावर आलीये. अशातच खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं. त्यानंतर जयंत पाटलांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. समर्थकांनी रिल्समधून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना इशारा दिलाय.

सांगली लोकसभा काँग्रेसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी सुत्र हलवल्याच्या आरोपाची राजकीय वर्तुळात चर्चा होती.त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी जयंत पाटलांच्या इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलंय. इस्लामपूरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतच त्यांनी हे खुलं आव्हान दिलंय.

वसंतदादा आणि पतंगराव कदमांचं राजकारण या राज्यानं पाहीलंय...त्यांचीच पुढची पिढी सध्या सांगली जिल्ह्याचं राजकारण फिरवतेय. अशात जयंत पाटलांना दोन आघाड्यांवर लढाई लढायचीये..एकतर स्वपक्षीयांची नाराजी आणि दुसरीकडे मित्र पक्षातील विरोधक. या दोन्ही आघाड्यांवर लढताना जयंत पाटलांच्या राजकीय कौशल्याचा कस लागणार आहे.

विशाल आणि विश्वजित कदमांच्या जोडीनं जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं नियोजन केल्याचं दिसतंय...मात्र डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवणा-या जयंत पाटलांनी रिलमधून कडक इशारा दिल्यामुळे विधानसभेत महायुती विरूद्ध महाआघाडीपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

Sangli Politics: सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने? जयंत पाटलांचा विशाल-विश्वजित कदमांना इशारा?
Sangli Politics: लोकसभेसारखी गद्दारी होऊ देणार नाही; विधानसभेसाठी चंद्रहार पाटलांनी थोपटले दंड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com