Sangli Politics: लोकसभेसारखी गद्दारी होऊ देणार नाही; विधानसभेसाठी चंद्रहार पाटलांनी थोपटले दंड

Chandrahar Patil On Vidhan Sabha: सांगलीत लोकसभेप्रमाणे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची लढत होणार आहे. जागा वाटपावरून मविआत मतभेद असल्याचे समोर आले आहे.
Chandrahar Patil On Vidhan Sabha
Chandrahar Patil On Vidhan Sabha
Published On

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या दोन जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे त्या मिळवण्याचा विषयच येत नाही. त्या आमच्याच जागा आहेत, त्यामुळे त्या आम्हीच लढवणार आहोत. लोकसभेत झालेली गद्दारी आता पुढे होणार नसल्याचं म्हणत चंद्रहार पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत.

आज चंद्रहार पाटील यांनी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची भेट घेतली. यावेळी चंद्रहार पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरुन खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना इशारा दिलाय का असा सवाल केला जात आहे. यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान सांगलीत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून मविआत मतभेद असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत चंद्रहार पाटील यांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. सोबतच लोकसभेत जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी पक्षश्रेष्टींनी दखल घेतली असून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्रितपणे लढेल आणि लोकसभेत मविआला जसे यश मिळाले तसेच यश मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत "कही खुशी कही गम" अशी परिस्थिती राहिली कारण माझा जरी विजय झाला तरी आमचे मित्र चंद्रहार पाटील यांचा काही मतांनी पराभव झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली. चंद्रहार पाटील यांनी निलेश लंके यांची अहमदनगर येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी लंके बोलत होते. अपयश ही यशाची पायरी असते आणि पैलवान हा खेळाडू वृत्तीचा असतो त्यामुळे या निवडणुकीत आपण कुठे कमी याचा अभ्यास करून चंद्रहार पाटील हे पुढील निवडणुकीला सामोरे जाऊन यश मिळवतील, असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला.

Chandrahar Patil On Vidhan Sabha
Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com