बीडमध्ये मोठी दुर्घटना! महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ विभागप्रमुखाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Doctor Drowning Case : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
Doctor Drowning Case
Doctor Drowning Caseसाम टीव्ही मराठी
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Beed doctor drowning news today : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (स्वराती) भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवीट साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. आज सकाळी ६:३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या वृत्तप्रसारामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, डॉ. तरकसे यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.

डॉ. अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना पोहणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आला. त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता, हा मृतदेह डॉ. तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

Doctor Drowning Case
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० कधी येणार? सरकारने दिली मोठी अपडेट, पैसे मिळवण्यासाठी हे काम आजच करा

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर

मूळचे अंबाजोगाईजवळील धावडी गावचे रहिवासी असलेल्या डॉ. अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) घेतली. पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉ. तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

Doctor Drowning Case
Gold Rate Today: पेट्रोल वाढलं, सोन्याचे काय झालं? वाचा 22k, 24k सोन्याचे ताजे दर

वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ; शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होणार

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्वराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मित्रांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणला. डॉ. तरकसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्यांना पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडले, याचा खुलासा शवविच्छेदन अहवाल (Post-Mortem Report) आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. एका अत्यंत मनमिळाऊ आणि हुशार तज्ज्ञ डॉक्टरांच्या अकाली जाण्याने अंबाजोगाई शहरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Doctor Drowning Case
बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com