

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता
पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम लगेच करा
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. आता पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर तुम्हीही पीएम किसानच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही माहिती तुम्हाला माहित असायलाच हवी.
पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana 23rd Installment Date)
पीएम किसान योजनेच्या नियमानुसार, केंद्र सरकार वर्षभरात ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ६००० रुपये देते. प्रत्येक चार महिन्यांची शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जातात. हे तीन हप्ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी असतात.
आता शेतकऱ्यांना २२वा हप्ता मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल ते जुलै महिन्याचा २३वा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात येऊ शकतो. दरम्यान, सरकारकडून अद्याप अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.
हे काम लगेच करा अन्यथा पैसे मिळणार नाही (PM Kisan Yojana Do These Work)
सरकारने पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र व्हेरिफिकेशन पूर्ण नाही त्यांना हप्ता मिळणार नाही.
ईकेवायसी अनिवार्य (PM Kisan Yojan eKYC)
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन केवायसी करु शकतात.
बँक खाते आणि आधार लिंक
तुमचे बँक खाते अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. याचसोबत बँक खाते आणि आधार कार्ड लिंक होणे गरजेचे आहे.
जमिनीची पडताळणी
तुमच्या नावावर असलेल्या जमिनीचे रेकॉर्ड सरकारी डेटाबेसमध्ये व्हेरिफाय असणे गरजेचे आहे. जर जमिनीची पडताळणी झाली नसेल तर पैसे येणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.