Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Beed Crime News : केज शहरातील अल्पवयीन मुलीचे सावत्र भावाने अपहरण केल्याचा प्रकार उघड झाला. अवघ्या १२ तासांत मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Beed Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • शाळेतून घरी न परतलेल्या मुलीच्या बेपत्ता प्रकरणातून अपहरणाचा खुलासा

  • सावत्र भावावर अपहरणाचा आरोप

  • पोलिसांनी ताब्यात घेतले

  • रेल्वे स्टेशन परिसरातून मुलीची सुखरूप सुटका

बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावत्र भावाने त्याच्याच अल्पवयीन बहिणीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेतील सावत्र भावाला केज पोलिसांनी परळी पोलिसांच्या मदतीने कारवाई करून, १२ तासांच्या आत ताब्यात घेत अल्पवयीन मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज शहरातील एका महिलेच्या पतीचे तीन वर्षा पूर्वी निधन झाले आहे. तिला त्याच्या पासून दोन मुले आणि एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या मृत्यू नंतर त्या महिलेने लातूर येथील एका व्यक्ती सोबत दुसरे लग्न केले आहे. दि. १६ फेब्रुवारी रोजी त्या महिलेची दहावीत शिकणारी मुलगी व पाचवीच्या वर्गात शिकत असलेला १० वर्ष वयाचा मुलगा हे दोघे शाळेत गेले होते.

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
HSC Board Exam : कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा! चीट पुरवल्याप्रकरणी २६ शिक्षक निलंबित

दुपारी १:०० वाजता शाळा सुटल्या नंतर मुलगा घरी आला परंतु मुलगी घरी आली नाही; म्हणून चौकशी केली असता मुलगी बस स्टँडवर गेल्याची माहिती मिळाली. तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून बेपत्ता मुलीच्या आईने दि. १६ फेब्रुवारी रोजी केज पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तसेच मुलीला तिच्या दुसऱ्या पतीच्या पहिल्या बायकोच्या मुलाने म्हणजे सावत्र भावानेच अज्ञात कारणासाठी फूस लावून अपहरण केले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले.

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Badlapur : महिला पत्रकारावर हल्ला, बदलापूरमधील घटनेने खळबळ; भरदिवसा कार अडवली, काचा फोडल्या

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस नाईक शिवाजी कागदे यांनी तांत्रिक माहितीचे विशेषण करून अपहरणकर्त्याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन शोधले. या माहितीच्या आधारे आणि परळी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राठोड, पोलीस नाईक शिंदे, महिला पोलिस व स्टाफ यांनी अल्पवयीन मुलगी आणि तिचा सावत्रभाऊ या दोघांना परळीचे बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला. या शोधमोहिमेदरम्यान पीडित मुलगी आणि तिचे अपहरण केलेला सावत्र भाऊ हे दोघे परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात पोलिस पथकाला आढळून आले.

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना

पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस नाईक शिवाजी कागदे आणि परळी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राठोड, पोलीस नाईक शिंदे व स्टाफ यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरणकर्ता तिचा सावत्र भाऊ यांच्या ताब्यातून मुलीची सुटका करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Accident News : एसटी बसची ऑटोला धडक, भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये शाळकरी मुलाचा समावेश

बारा तासात केली अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका -

दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता अपहरण झाले. त्या नंतर रात्री ११:०० अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि दि. १७ फेब्रुवारी रोजी अवघ्या बारा तासाच्या आत अपाहणकर्त्या सावत्र भावाला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. यामुळे पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com