Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना

Hingoli News : हिंगोलीत अपघातात जखमी झालेल्या तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार नाकारल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांकडून विलंब झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना
Hingoli News Saam Tv
Published On
Summary
  • हिंगोलीतील अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयामध्ये उपचार नाकारल्याचा आरोप

  • ३५ मिनिटे विलंब झाल्याचा व्हिडिओ समोर

  • वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णाला परभणीला हलवले

  • ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

संदीप नागरे, हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. हिंगोली परभणी रस्त्यावर काल रात्री अपघातात जखमी झालेल्या तरुणावर, जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी चक्क उपचार नाकारल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.

खाजगी रुग्णवाहिका चालक, पोलीस आणि नागरिक आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना उपचार करण्यासाठी विनवणी करत असताना देखील, रुग्णाला इथे उपचाराची गरज नाही हिंगोलीच्या रुग्णालयात घेऊन असे म्हणत प्राथमिक उपचार डॉक्टरांनी नाकारले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात असलेला हा जखमी तरुण 35 मिनिट तडफडत असताना डॉक्टर आणि कर्मचारी वाद घालत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना
Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

अखेर हिंगोलीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत या तरुणावर थातूरमातूर उपचार करत पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात रेफर केले आहे. औंढा पोलिसांनी या अपघातातील धडक देणारे पिकप वाहन ताब्यात घेतले असून जखमी तरुणाची ओळख पटवणे सुरू केले आहे.

Hingoli : डॉक्टरचा माजोरडेपणा, अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारास नकार; हिंगोलीतील संतापजनक घटना
Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

या प्रकारामुळे उपचार करणारी आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या जीवितवास धोका पोहोचवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री ढासाळलेल्या ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com