वाशिममध्ये १२वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघड
५८१ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांत समानता
२६ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अमरावती बोर्डाकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवला
मनोज जैस्वाल, वाशीम
राज्यात सर्वत्र १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केली आहे. मात्र काही ठिकाणी उघडपणे कॉपीचे प्रकार सुरु आहेत. यासाठी शिक्षकच मुलांना मदत करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकार वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयात घडला आहे.
वाशिम जिल्ह्यातील 'टो इथल्या संत मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली. याप्रकरणी आता शिक्षण विभागाने या परीक्षा केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. २६ शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, वाशिम जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे. काल इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपर दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी परीक्षा केंद्रावर तपासणी केली असता काही विध्यार्थ्यांच्या उत्तरात समानता आढळून आली होती. त्यामुळं या ठिकाणचे सिसिटीव्ही तपाण्यात आले आणि विध्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव अमरावती बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.तर कर्मचाऱ्यांवर तात्काळ करण्यात आली आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे सध्या बारावीची परीक्षा चालू आहे. दगडाला बांधून कॉपी वर्गात टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हाधिकारी यांनी कॉपी मुक्त अभियान राबवले आहे. प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असं जिल्हाधिकारींनी सांगितलं. मात्र याच ठिकाणी काही तरुण कॉपी देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या संदर्भात काय दखल घेतली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.