Baramati Accident: बारामतीमध्ये थरकाप उडवणारा अपघात, भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून २ मुलींचा मृत्यू

Tragic Road Accident in Baramati: बारामतीमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. नीरा-मोरगाव राज्य मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला.
Baramati Accident: बारामतीमध्ये थरकाप उडवणारा अपघात, भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून २ मुलींचा मृत्यू
Baramati AccidentSaam Tv
Published On
  • बारामतीमध्ये भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

  • निरा-मोरगाव राज्य मार्गावर घडली घटना

  • भरधाव टेम्पोची दुचाकीचा धडक

  • अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाला

मंगेश कचरे, बारामती

बारामतीमध्ये भीषण अपघातामध्ये दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. निरा - मोरगाव राज्य मार्गावर हा भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणारे तिघे जण रस्त्यावर पडले. ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अपघातानंतर राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. निरा -मोरगाव राज्य मार्गावर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात गुळूंचेपासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. तिघे जण दुचाकीवरून सोमेश्वर देवस्थानकडे जात होते. त्याचवेळी टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. टेम्पोने दुचाकीला १५० फूट फरपटत नेले. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला.

Baramati Accident: बारामतीमध्ये थरकाप उडवणारा अपघात, भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून २ मुलींचा मृत्यू
Accident News : अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, पिकअपची ट्रेलरला धडक; एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर जखमी झालेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मृत तरुणींची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची स्पीड ब्रेकरची मागणी आहे.

Baramati Accident: बारामतीमध्ये थरकाप उडवणारा अपघात, भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून २ मुलींचा मृत्यू
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

गेल्या काही वर्षात चार ते पाच अपघात होऊन या ठिकाणी काही जण जायबंदी झाले आहेत. तर काहींना अपंगत्व आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघींचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Baramati Accident: बारामतीमध्ये थरकाप उडवणारा अपघात, भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून २ मुलींचा मृत्यू
Accident: महामार्गावर भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; ५ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com