Accident News : अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, पिकअपची ट्रेलरला धडक; एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू

Punjab Accident News : पंजाबमधील फिरोजपूर येथे अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या पिकअप ट्रकची ट्रेलरला भीषण धडक बसून ९ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ हून अधिक जण जखमी झाले आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
PUNJAB ROAD ACCIDENT: 8 KILLED, OVER 15 INJURED AFTER PICKUP TRUCK COLLIDES WITH TRAILER IN FEROZEPUR
PUNJAB ROAD ACCIDENT: 8 KILLED, OVER 15 INJURED AFTER PICKUP TRUCK COLLIDES WITH TRAILER IN FEROZEPURSaam tv
Published On
Summary
  • पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघात

  • पिकअप ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू

  • अपघातात १५ हून अधिक जण जखमी झाले, अनेकांची प्रकृती गंभीर

  • ट्रेलरमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भीषण रस्ते अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जंगा वळणाजवळ पिकअप ट्रक आणि ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील सुमारे ३० जण अस्थी विसर्जनासाठी पिकअप ट्रकमधून प्रवास करत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ते घरातून निघाले होते. प्रवासादरम्यान ट्रकमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पुढील प्रवास सुरू केला. जंगा वळणाजवळ पोचताच पिकअप ट्रकची ट्रेलरला जोरदार धडक बसली.

PUNJAB ROAD ACCIDENT: 8 KILLED, OVER 15 INJURED AFTER PICKUP TRUCK COLLIDES WITH TRAILER IN FEROZEPUR
Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेह

पिकअप ट्रकमध्ये प्रवास करणाऱ्या अंशप्रीत यांनी सांगितले की, वळणाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रेलरला त्यांच्या वाहनाची अचानक धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की पिकअप ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आणि वाहन उलटले. ट्रकला छप्पर असल्याने त्यामध्ये बसलेले अनेक प्रवासी वाहनातच अडकून पडले.

PUNJAB ROAD ACCIDENT: 8 KILLED, OVER 15 INJURED AFTER PICKUP TRUCK COLLIDES WITH TRAILER IN FEROZEPUR
Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रेलरमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com