Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेह

Mumbai Nalasopara Crime News : नालासोपारातील धक्कादायक घटना! बेपत्ता कुख्यात गँगस्टर रवि बिडलानचा सांगाडा चेंबरमध्ये सापडला. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
RAVI BIDLAN MURDER CASE: MISSING GANGSTER'S SKELETON FOUND IN NALASOPARA DRAINAGE CHAMBER
RAVI BIDLAN MURDER CASE: MISSING GANGSTER'S SKELETON FOUND IN NALASOPARA DRAINAGE CHAMBERSaam Tv
Published On
Summary
  • नालासोपारा पूर्वेतील ड्रेनेज चेंबरमधून मानवी सांगाडा सापडला

  • सांगाडा कुख्यात गुंड रवि बिडलानचा असल्याची प्राथमिक माहिती

  • एक आरोपी अटकेत असून चार संशयितांची चौकशी सुरू

  • हत्या करून मृतदेह ड्रेनेजमध्ये टाकल्याचा संशय

मनोज तांबे, नालासोपारा

Nalasopara Ravi Bidlan Murder Case नालासोपारामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालासोपारा पूर्वेतील वैतिवाडी परिसरातील एका ड्रेनेजमधून मानवी सांगाडा आढळून आला आहे. पोलीस तपासात तो सांगाडा गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान याचा असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी पाच जणांविरोधात कट रचून हत्या करणे आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपींच्या एका दारू पार्टीदरम्यान रवि बिडलान याच्या हत्येबाबत चर्चा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर वैतिवाडी परिसरातील ड्रेनेज चेंबरची पाहणी करण्यात आली असता तिकडून मानवी सांगाडा आणि काही फाटलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले.

RAVI BIDLAN MURDER CASE: MISSING GANGSTER'S SKELETON FOUND IN NALASOPARA DRAINAGE CHAMBER
Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

घटनास्थळी सापडलेल्या कपड्यांची ओळख रवि बिडलान याच्या पत्नीने केली. डीएनए तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले असून, अहवालानंतर अधिकृत पुष्टी होणार आहे. या प्रकरणात सुमित आझाद सालासार उर्फ ‘बा’ याला अटक करण्यात आली आहे. तसेच रोहन संजय जगदाळे उर्फ ‘टायगर’ याच्यासह अन्य तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आरोपींनी कट रचून रवि बिडलान यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो ड्रेनेज चेंबरमध्ये टाकल्याचा पोलिसांना संशय आहे.

RAVI BIDLAN MURDER CASE: MISSING GANGSTER'S SKELETON FOUND IN NALASOPARA DRAINAGE CHAMBER
Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

रवि बिडलान (Ravi Bidlan Dead) हा परिसरातील कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, लूटमार, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारहाण यांसारखे डझनभर गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच गेल्या वर्षी त्याला पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले होते. ही हत्या का करण्यात आली? याचं नेमकं कारण समोर आलं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com