

गुजरातच्या मोरबी-हलवद महामार्गावर भीषण अपघात
५ जिवलग मित्रांचा मृत्यू झाला
भरधाव कार कंपनीतून बाहेर पडणाऱ्या डंपरला जाऊन धडकली
कारमधील ७ जणांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी आहेत
गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ५ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुजरातच्या मोरबी- हलवद महामार्गावर ही अपघाताची घटना घडली. भरधाव कारने डंपरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये रणछोडगड गावातील ५ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे पाचही जण एकाच गावात राहणारे होते. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी-हलवद महामार्गावर चरडवा गावाच्या जवळ रात्री हा अपघात झाला. भरधाव कार कंपनीतून बाहेर पडत असलेल्या डंपरला जाऊन धडकली. या अपघातामध्ये रणछोडगड गावातील ५ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. या कारमधून ७ जण प्रवास करत होते. यामधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घडलं असं की, हलवाद तालुक्यात मानसर गावाजवळ दुचाकीला अपघात झाला. या अपघातामध्ये रणछोडगड गावातील दिलीप दहिया यांचा २४ वर्षीय मुलगा परेश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी रणछोडगड गावातील काही तरुण त्याला त्यांच्या कारमधून रुग्णालयात घेऊन जात होते. त्याचवेळी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अपघात झाला.
रात्री सुमारे साडेनऊ वाजता, चारडवा गावाजवळ एका पेट्रोल पंपासमोर कंपनीतून बाहेर येणाऱ्या एका डंपरने अचानक वळण घेतलं. मित्राला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कारचालक कार वेगाने चालवत होता. यावेळी कार थेट डंपरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरात होती की कार थेट डंपरखाली अडकली. त्यामुळे या अपघातामध्ये कारमधील सर्व तरुण चिरडले गेले. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत दोन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
तर ५ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेले पाचही तरुण रणछोडगड गावचे रहिवासी होते. सुरेश सिहोरा (४५ वर्षे), विराम दहिया (२८ वर्षे), परेश दहिया (२४ वर्षे), प्रेमजी दहिया आणि भरत दहिया यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
तर प्रकाश दहिया आणि दिलीप दहिया यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मोरबी आणि राजकोट येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे रणछोडगड गावावर शोककळा पसरली आहे. सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.