Badlapur News : मान्यता पहिलीपर्यंत, वर्ग दहावीपर्यंतचे; आंदोलकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला नोटांचा हार

Badlapur School News Update : ज्या शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग झाला, त्या शाळेत पहिलीपर्यंत मान्यता असताना दहावीपर्यंत वर्ग चालवले जात होते. याचा निषेध शरद पवार गटाकडून करण्यात आला.
बदलापूर येथील शाळेत गट शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार,शरद पवार गटाकडून अनोखे आंदोलन
badlapur newssaam tv
Published On

अजय दुधाणे | साम टीव्ही प्रतिनिधी

बदलापूर : येथील एका खासगी शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी उघड झाली होती. यानंतर शाळेचा आणखी एक प्रताप समोर आला. त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यालाच नोटांचा हार घालून निषेध केला आहे.

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेला काही महिने उलटत नाहीत, तोच बदलापूरमधील एका शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थिनीचा विनायभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक देखील करण्यात आली. यानंतर या पोलिसांकडून शाळेत अधिक तपास सुरू झाला. या प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिलीपर्यंतच मान्यता असलेल्या शाळेत दहावीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याचे तपासात उघडकीस आले.

बदलापूर येथील शाळेत गट शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार,शरद पवार गटाकडून अनोखे आंदोलन
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे अश्लील चाळे

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष आक्रमक झाला आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालून निषेध नोंदवला. या प्रकरणात गटशिक्षण अधिकारी आर. डी. जतकर यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे. शाळेला परवानगी नसतानाही जतकर यांच्या आशिर्वादाने ती शाळा सुरू होती. कारण त्यांच्या भावाचीच या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती होती. पैसे घेऊन अशा अनेक शाळांना अभय दिला जात असल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केला.

बदलापूर येथील शाळेत गट शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार,शरद पवार गटाकडून अनोखे आंदोलन
Crime : बायकोनं गळफास घेत आयुष्य संपवलं, त्याच रात्री नवऱ्यानेही दिला जीव, २ मुलं झाली पोरकी

गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा बेकायदेशीर शाळा सुरू राहतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच निष्काळजीपणा केला जात असेल, तर अशांना तात्काळ बडतर्फ करायला हवे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com