Crime : बायकोनं गळफास घेत आयुष्य संपवलं, त्याच रात्री नवऱ्यानेही दिला जीव, २ मुलं झाली पोरकी

UP Crime News : जेवणानंतर नवरा बायकोमध्ये तुफान भांडण झालं. त्या भांडणानंतर बायकोनं टोकाचे पाऊल उचलले. पत्नीला फासावर लटकवल्याचे पाहून नवऱ्यानेही जीव दिला.
Husband Wife End Life Hamirpur
Husband Wife End Life HamirpurAI Image
Published On

Husband Wife End Life Hamirpur : बायकोला फासावर लटकलेलं पाहिल्यानंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. हमीरपूरमधील मेरापूर गावात कौटुंबिक वादातून नवरा-बायकोनं टोकाचं पाऊल उचलले. पत्नीनं गळफास घेतलेलं पाहिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मुलांना रूमच्या बाहेर काढलं अन् गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

आई आणि बापाने आयुष्य संपवल्यानंतर दोन मुलं पोरकी झाली आहेत. कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबिय लग्नासाठी बाहेर गेले होते. रात्री जेवणानंतर नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरत पत्नीने गळफास घेत आयुष्य संपवले. नवऱ्याने पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्यानंतर स्तब्ध झाला. त्यानेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्याने आपल्या दोन्ही मुलांना खोलीच्या बाहेर काढले. त्यानंतर फासी घेत आयुष्याचा शेवट केला.

Husband Wife End Life Hamirpur
Crime : 500 कोटींच्या कंपनीचा मालक, अमेरिकेतून परतल्यानंतर नातीने केली हत्या, चाकूने ७० वेळा भोसकलं

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत चौकशी सुरू केली. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पॉरेन्सिक पथकाकडून घराची टेहाळणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून आत्महत्याच्या कारणाचा तपास सुरू आहे. सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. नवरा-बायकोच्या आत्महत्यामुळे मेरापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Husband Wife End Life Hamirpur
Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा

रामू वर्मा रोजंदारीचं काम करत होता. दररोज येणाऱ्या पैशांवरच त्यांचं घर चालत होते. त्याला दारू पिण्याची वाईट सवय होती. रामूचं दारू पिणं पत्नीला खटकत होतं,त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत होते. सोमवारी रात्री रामू दारू पिऊ घरी आला. जेवण झाल्यानंतर त्याच कारणामुळे दोघांत कडाक्याचे भांडण झालं. रूबी नाराज झाली. त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. दोघांना चार आणि तीन वर्षांचा मुलगा आहे.

Husband Wife End Life Hamirpur
माता न तू वैरिणी! बहिणीला फसवण्यासाठी पोटच्या पोराचा जीव घेतला, ९ महिन्याच्या चिमुकल्याला छतावरून फेकलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com