Crime : 500 कोटींच्या कंपनीचा मालक, अमेरिकेतून परतल्यानंतर नातीने केली हत्या, चाकूने ७० वेळा भोसकलं

Hyderabad businessman Murder Case : तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये ८६ वर्षीय वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव यांची हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून २९ वर्षीय नातीने ७० वर्षीय आजोबाला संपवल्याचं समोर आलेय.
crime news marathi
crime news marathi Saam tv
Published On

Hyderabad businessman Murder Case Update : २९ वर्षीय नातीने ८६ वर्षीय आजोबाची हत्या केल्याच्या घटनेनं हैदराबाद हादरलेय. संपत्तीच्या वादातानू नातीने आजोबाचा जीव घेतला. वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे ८६ वर्षीय संस्थापक, वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव यांची त्यांच्याच घरी हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावर चाकूचे अनेक वार होते. पोलिसांनी याप्रकरणी नात किलारू किर्ती तेजा याला बेड्या ठोकल्या आहे. वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव हे ५०० कोटींच्या कंपनीचे मालक होते. संपत्तीच्या वादातूनच त्यांची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजाने आपल्या आजोबाला ७० पेक्षा जास्त वेळा चाकूने भोसकले. पोस्टमार्टम रिपोर्ट्स लवकरच येतील. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हस्तगत केलाय. आजोबाची हत्या केल्यानंतर तेजाने आईवरही हल्ला केला होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

crime news marathi
Shirish Maharaj : संवेदनशिलता! शिरीष महाराजांचे कर्ज एकनाथ शिंदेंनी एका झटक्यात फेडलं, मोरे कुटुंबाला 32 लाखांची मदत

हत्या केल्यानंतर कपडे बदलून पसार

पंजगुट्टा येथील पोलीस अधिकारी बी. शोभन यांनी सांगितले की, गुरूवारी रात्री २९ वर्षीय तेजा आणि जनादर्न यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात असलेल्या तेजा हिने आजोबावर चाकूने हल्ला केला. त्याने अनेकदा आजोबाला चाकूने भोकसले. शेजारी असणारी आईवरही त्याने हल्ला केला. आजोबाची हत्या केल्यानंतर तेजा कपडे बदलून पसार झाली.

crime news marathi
Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

पोलिसांनी तेजाला ठोकल्या बेड्या -

वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव यांच्या अंगावर चाकूच्या अनेक जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आजोबाची हत्या केल्यानंतर तेजा हैदराबाद सोडून पळणार होती, पण त्याचवेळी पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. पंजगुट्टा फ्लायओव्हरजवळच तेजाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अमेरिकेतून शिक्षण घेऊन आला -

तेजा उच्चशिक्षित आहे. अमेरिकेतून मास्टर डिग्री घेऊन नुकताच हैदराबादमध्ये परतली होती. ती हैदराबादमध्ये लैमको हिल्स येथे राहात होता. आजोबा आणि तिचे काही पटत नव्हते. संपत्तीमुळे दोघांमध्ये वितुष्ट आले होते. जनार्दन राव यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तेजा ही दुसरी मुलगी सरोजनीची मुलगी आहे.

आईसोबत आजोबाच्या घरी गेला

पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशीच तेजा आईसोबत आजोबाच्या घरी पोहचली होती. त्यावेळी आजोबा आणि तेजा यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या तेजाने आजोबावर हल्ला केला. थांबवाया आलेल्या आईवरही तेजाने हल्ला केला. आईवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com