Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

Vande Bharat Sleeper train Update : नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात मर्यादीत ट्रेन धावत आहेत, त्यामुळेच नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावण्याच शक्यता आहे.
Vande Bharat
Vande Bharat Metro line
Published On

Vande Bharat Sleeper train News Update : नागपूरला पुणे आणि मुंबईला जोडणारी हाय स्पीड सुपरफास्ट ट्रेन वंदे भारत स्लीपर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर रेल्वे विभागाकडून दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी केंद्रीय बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच महाराष्ट्राला दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळतील. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवासही होईल.

नागपूर-मुंबई १० तासांत -

नागपूर ते मुंबई या रेल्वे प्रवासासाठी आता सरासरी १६ ते १७ तासांचा कालावधी लागतो. सुपरफास्ट ट्रेनला १३ तास लागतात. दुरंतो एक्सप्रेसला १२ तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर आणखी कमी करेल. रिपोर्ट्सनुसार, नागपूर ते मुंबई हे अंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनने फक्त १० तासांत पूर्ण होईल. नागपूर-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास सहा तासांचा वेळ वाचणार आहे.

Vande Bharat
Vande Bharat Sleeper : नागपूर-मुंबई फक्त १० तासांवर, तब्बल ६ तासांचा वेळ वाचणार, तिकिटाची किंमतही समोर

नागपुर ते पुणे फक्त 3 तासांत

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने नागपूर ते पुणे हे अंतर फक्त तीन तासांवर येऊ शकते, असे सांगण्यात येतेय. सध्या नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेस चालते, तेही आठवड्यातून तीन वेळा. हमसफर एक्सप्रेस आठवड्यातून एकदाच धावते. नागपूर-पुणे या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त आहे,पण रेल्वे कमी आहेत. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर ते पुणे या अंतरासाठी सध्या १० तासांचा वेळ लागतो, हच अंतर तीन तासांत पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.

Vande Bharat
Vande Bharat Express : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रॅकवर कधी येणार, तिकीट किती? A टू Z माहिती

वंदे भारत स्लीपरची मागणी -

नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत स्लीपर ट्रेनची मागणी करण्यात येत आहे. डीआरएम विनायक गर्ग यांनी लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळेल असे संकेत दिले आहेत.

Vande Bharat
Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेन धावणार, तिकीट किती? कुठे थांबणार?

नागपूर पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास दोन शहरे आणखी जवळ येणार आहे. नागरिकांच प्रवास आणखी आरामदायी आणि जलद होईल. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर रेल्वे प्रवासाची संख्या वाढली आहे. त्यामुळे ट्रेनच्या संख्येतही हळूहळू वाढ झाली. आता त्यामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनची भर पडणार आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार -

वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवास आरामदायक होणार आहेच. त्याशिवाय वेळही वाचेल. या नव्या कोऱ्या ट्रेनमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या प्रवास सूकर होईल. त्याशिवाय महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जातेय. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गांवरील प्रवाशांची संख्या वाढवण्याचे एक कारण म्हणजे व्यवसायाशी संबंधित प्रवास हे होय.

त्यामुळेच नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गावर वंदे भारत ट्रेनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नागपूर-पुणे मार्गावरील ट्रेन कमी आणि प्रवासी जास्त असल्यामुळे ट्रेनला नेहमीच वेटिंग असते. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर लोकांना सहज तिकिट उपलब्ध होईल. त्याशिवाय प्रवासही अधिक जलद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com