मराठवाडा PWD चे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी 31 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला
पदोन्नती रखडल्यामुळे नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला
बदलीच्या आदेशानंतर रुजू होण्याच्या दिवशीच त्यांनी राजीनामा दिला
छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या बातमीने प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काल म्हणजेच ३१ जुलै रोजी त्यांनी विभागाच्या सचिवांकडे आपला राजीनामा सादर केला असून त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर "अंत नहीं, यह एक नई शुरुआत है..." असा डीपी ठेवला. त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
साम टीव्हीच्या सूत्रांनुसार, , सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असूनही अतुल चव्हाण यांची फाईल शासन स्तरावर खोळंबल्यामुळे त्यांनी नाराजीतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. नियमानुसार त्यांची सेवानिवृत्ती मार्च २०३० मध्ये होणार होती. मात्र, चार वर्षे आधीच त्यांनी स्वेच्छेने सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
काही महिन्यांपूर्वी शासनाने त्यांची नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी (मुंबई) येथे मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि ३१ जुलै रोजी नवीन पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिल्याने या निर्णयामागील नेमके कारण काय, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.
अतुल चव्हाण यांनी १६ ऑगस्ट १९९४ रोजी शासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांनी जवळपास ३२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये योगदान दिले. अष्टविनायक दर्शन मार्ग, समृद्धी महामार्ग, विद्यापीठातील डिजिटल स्टुडिओ तसेच कोल्हापूर सर्किट बेंच यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या या कारकिर्दीची दखल घेत २०१० मध्ये त्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.