Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?' दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल

Dilip Walse Patil Speech: मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांताध्यक्ष सुनिल तटकरेही उपस्थित होते.
Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?', दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल
Dilip Walse PatilSaam TV
Published On

Ambegaon Assembly Election 2024: 'विरोधक म्हणतात मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला? आता मला सांगा, घरातील वडीलधारी मंडळी किती ही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतोच. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते असे आरोप करत आहेत.. असे म्हणत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी टिकाकारांना उत्तर दिले. आंबेगाव विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरताना ते बोलत होते.

Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?', दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल
Maharashtra Politics: 'निवडणुकीत पैशांचा महापूर, महायुतीकडून ४ हजार कोटींचा चुराडा..' मविआच्या नेत्याचा खळबळजनक दावा

आंबेगावमधून उमेदवारी अर्ज दाखल

आजपासून विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांताध्यक्ष सुनिल तटकरेही उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी वळसे पाटील यांचे त्यांच्या निवासस्थानी औक्षण केले त्यासोबत परिसरातील प्रमुख देवतांचे दर्शन देखील घेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अर्ज भरल्यानंतर झालेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले वळसे पाटील?

विरोधक म्हणतात मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला? आता मला सांगा घरातील वडीलधारी मंडळी किती ही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतोच. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ते असे आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच यंदाच्या विधानसभेत परिस्थिती बदललेली आहे. मात्र माझ्या समोर कोणतंही आव्हान नाही, असा विश्वास दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला.

Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?', दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल
Dindori Assembly: 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अर्ज भरण्याआधी नरहरी झिरवळांचे मोठे विधान; चर्चा रंगल्या!

दरम्यान, एकीकडे शरद पवारांचे वय झालंय, आता त्यांनी आम्हाला संधी द्यावी. वडील कधी न कधी मुलांच्या हातात कारभार देतातचं, असं अजित पवार वारंवार म्हणतात. आपल्या भाषणामध्ये ते नेहमीच शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करतात. अशातच दिलीप वळसेंनी विरोधात उभं राहणाऱ्यांना उद्देशून बोलताना मात्र हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना कधी बाजूला करतो का? असं वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Dilip Walse Patil: 'हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना बाजूला करतो का?', दिलीप वळसेंचा विरोधकांना सवाल
Sanjay Raut: 'महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करणाऱ्यांकडे जनता बघेल', संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला, 'माहिम' वरुन थेट इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com