मयुर राणे, मुंबई
Sanjay Raut On Raj Thackeray: काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष यांच्यामध्ये अजिबात वाद नाही. काल पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये मविआचा अंतिम फॉर्म्युला ठरला. दोन्ही बाजूला आघाडी आहे पण कोणाचा अंतिम फॉर्म्युला या महाराष्ट्रात जाहीर झाला आहे का? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तोफ डागली. यावेळी बोलताना त्यांनी माहिम विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यावरुनही महत्वाचे विधान केले.
"आकडे मोजताना आमच्याकडे खोक्यांचा हिशोब नसल्यामुळे 85 85 85 बोलत आहेत. महाविकास आघाडी 288 जागा लढणार आहे. साधारण काल आमच्यात 85 85 85 जागांची बोलणी झाली आहे ते जाहीर करा. आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली फार घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणी काही मतदारसंघात आदल्याबद्दल होऊ शकते. महाराष्ट्रात आम्ही 175 जागा जिंकू हीत आमची बेरीज आहे," असे संजय राऊत म्हणाले.
"सांगोलाच्या जागेवरती चर्चा सुरू आहे. सांगोलामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. परंडामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. सेट टू सीट चर्चा होतात. 288 जागेवर चर्चा विचारानंतर शक्य आहे का? काही ओव्हर खेळायच्या शिल्लक आहेत. आम्ही 85 पर्यंत आलो आहोत. काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणताही वाद नाही. मग महायुतीचे पक्ष सागर बंगल्यावर काय जिलब्या खायला बसतात का?" असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
"निवडणुकीत लढावीच लागते, निवडणूक हे युद्ध आहे. राज्याची जनता एवढंच बघेल की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र द्रोह्यांना कोण मदत करत आहे. कालपर्यंत जे अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवून देऊ नका अशा गर्जना करत होते ते अप्रत्यक्षपणे मोदी- शहांना महाराष्ट्र हातात घेता यावा त्यासाठी मदत करत आहेत. हे या राज्याचे जनता यावेळी काळजीपूर्वक पाहणार आहे. जे आमच्याबरोबर येणार नाही ते महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत करत होते याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात होईल,"असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.