अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, 'ही' ३ मंदिरे १ महिना राहणार बंद

Ashtavinayak Temples Closed Dates May 2026 Maharashtra: अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील तीन प्रमुख गणपती मंदिरे 10 मे ते 9 जून 2026 दरम्यान संवर्धन कामामुळे बंद राहणार आहेत.
Devotees gather outside an Ashtavinayak temple as authorities announce temporary closure for restoration work
Devotees gather outside an Ashtavinayak temple as authorities announce temporary closure for restoration worksaam tv
Published On

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांमुळे पुणे महत्वाच्या तीन मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद राहणार आहेत. पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 मे ते जून 9 जून 2026 या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.

Devotees gather outside an Ashtavinayak temple as authorities announce temporary closure for restoration work
Bypoll Election Special Report : कसबा,चिंचवड, पोटनिवडणूक बिनविरोध होणार? पाहा हा स्पेशल रिपोर्ट!

कोणती मंदिरे बंद राहणार?

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखली सुरू असलेल्या दुरुस्ती कामांमुळे खालील मंदिरे बंद राहतील

श्री मयूरेश्वर मंदिर (मोरगाव)

श्री चिंतामणी मंदिर (थेऊर)

श्री सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक)

Devotees gather outside an Ashtavinayak temple as authorities announce temporary closure for restoration work
Ashok Kharat Case: कल्पना खरातच्या मैत्रिणी अन् नोकरांची SIT कडून चौकशी; धक्कादायक खुलासे होणार

मंदिरे का बंद राहणार?

मंदिराचा मुख्य गाभारा आणि संभामंडपाचे दगडी बांधकाम आणि पौराणिक स्वरूपाचे संवर्धन करणे. गर्दीमुळे कामात अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा आणि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील, मात्र भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. केवळ पुजारी, बांधकाम यंत्रणा आणि विश्वस्त यांनाच प्रवेश दिला जाईल.

Devotees gather outside an Ashtavinayak temple as authorities announce temporary closure for restoration work
Rahul Gandhi In Thane News | राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज ठाण्यात | Marathi News

मंदिराच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी हे काम अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com