Ashok Kharat Case: कल्पना खरातच्या मैत्रिणी अन् नोकरांची SIT कडून चौकशी; धक्कादायक खुलासे होणार

Kalpana Kharat Still Missing: नाशिक अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या शोधासाठी पोलिसांनी तिच्या मैत्रिणी आणि घरातील नोकरांची चौकशी सुरू केली आहे.

भोंदू अशेक खरातची पत्नी कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता तपासाचा वेग वाढवला आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून अशोक खरातची पत्नी कल्पना खरात नाशिकच्या घरातून फरार झाली झाली आहे. १० दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवायला सुरुवात केली आहेत. कल्पना खरातच्या माहेरी तसंच माहेरच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी तसंच तिच्या घरी सध्या काम करणाऱ्या आणि यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली आहे. मात्र अद्याप ठोस धागेदोरे न मिळाल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com